Pune: नऊ वर्षाच्या संघर्षानंतर तरूणाली न्याय; लोकअदालमध्ये मिळणार 40 लाख रुपये

पुणे – वडिलांसोबत मुलगी असलेल्या दुचाकीला पाठीमागून ट्रकने धडक दिली. त्यात वडील तर गेलेच. मात्र, 18 वर्षीय मुलीला 50 टक्केहून अधिक अपंगत्व आलेल्या मुलीला घटनेनंतर तब्बल 9 वर्षांनी न्याय मिळाला आहे. लोकअदालतमध्ये झालेल्या तडजोडीनुसार 40 लाख रुपये मिळणार आहेत.
मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य क्षीरसागर, ऍड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलसमोर ही तडजोड झाली. मुलीतर्फे ऍड. मीनाक्षी काकडे आणि ऍड. सुनील द्रविड यांची बाजू मांडली. तर विमा कंपनीच्या वतीने ऍड. ऋषिकेश गानू आणि ऍड. कविता अवस्थी यांनी काम पाहिले. विमा कंपनीचे अधिकारी रामा वगरे उपस्थित होते.
2014 मध्ये नऱ्हे येथून वारजे रस्त्यावर मुलगी आणि वडिल दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात वडिलांचा मृत्यू झाला. त्यांचा दावा निकाली निघाला आहे. मात्र, मुलगीच्या पायावरून ट्रकचे चाक गेले होते. वेळोवेळी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागत असे.
अपघतानंतर मुलगी स्वत:हून काम करू शकत नाही. तसेच तिला नोकरी सोडावी लागली. या प्रकरणात मुलीने ऍड. काकडे आणि ऍड. द्रविड यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात दावा दाखल केला होता.
वैद्यकीय बिल, मुलीला होणारा त्रास, ही परिस्थिती पाहता 75 लाख रुपये मिळण्याची मागणी या दाव्यात करण्यात आली. मात्र, 40 लाखांवर तडजोड झाली. याविषयी मुलीच्या कुटुंबियांनी सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून आम्ही न्यायालयीन लढाई देत आहोत. मात्र, लोकअदालतमुळे न्याय मिळाला आहे. न्यायालयीन प्रक्रीयेपासून सुटका झाली आहे. वेळेची बचत झाली आहे.





