Pune घोरपडीगावाचा पाणी प्रश्न मिटला; आमदार सुनील कांबळे यांच्या हस्ते टाकीचे लोकार्पण

पुणे – घोरपडी गाव आणि बी.टी.कवडे परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी समान पाणी योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल कांबळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या टाकीमुळे सुमारे दोन ते अडीच हजार घरांचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
सुमारे ४.५ दशलक्ष लीटरची क्षमता असलेली ही टाकी असून या टाकीमुळे या भागातील बालाजी नगर, श्रीनाथ नगर, गुलमोहर पार्क, बी.टी.कवडे नगर, निगडे नगर या ठिकाणी अनेकदा उद्भवणारा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. यावेळी माजी नगरसेविका मंगला मंत्री, लता धायरकर, हिमालीकांबळे, भाजपा शहर उपाध्यक्ष विवेक यादव,भाजपा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष सुशांत निगडे, निलेश आल्हाट, दिलीप कवडे, संकेत कवडे, प्रकाश मंत्री, निलेश मंत्री, श्रीकांत मंत्री, नारायण सावा, माजी नगरसेवक दिलीप गिरमकर, किशोर धायरकर, आशिष सुर्वे, निलेश बिडकर आदी उपस्थित होते.
“या पाण्याच्या टाकीमुळे सुमारे दोन ते अडीच हजार घरांचा पाणी पुरवठा सुरळीत होणार असून या परिसरातील पाण्याची समस्या कायमची मिटणार आहे. या सोबतच मतदारसंघातील इतर भागासाठीही कामे सुरू असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यावर आपला भर असून महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.” – सुनील कांबळे, आमदार, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ





