पुणे : खडकी पोलिसांकडून गांजा बाळगल्याची कारवाई करण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये २ लाख ८१ हजार रुपये किंमतीचा गांजा व गांजाची वाहतुक करणारी रिक्षा जप्त करण्यात आलेली आहे. ७ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशनचे मरीआई बीट मार्शल हे पुणे-मुंबई जुन्या द्रुतगती महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी कामगार आयुक्तालयाजवळ थांबलेल्या रिक्षामधून गांजाचा वास आला. रिक्षाची तपासणी केली असता २ लाख ८१ हजार २२० रुपयांचा ५ किलो गांजा जप्त मिळून आला. तर रिक्षामध्ये बसलेल्या अफजल सनाउल्ला सय्यद (वय ३९, रा. सर्व्हे क्रमांक २३०, सनराईज बेकरीच्या मागे, मूळ. दिघीहाटी, ता. वेल्हा) याच्यावर एनडीपीएस ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या प्रकरणात एस.टी.बसमधून गांजाची वाहतुक करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. दोघांकडून १ लाख १ हजार ७१० रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे. खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, अर्जून बेंदगुडे, पोलीस अंमलदार आशिष पवार, संदेश निकाळजे, शिवराज खेड, बीट मार्शल अंमलदार सुधाकर राठोड, सुधाकर तागड यांनी ही कारवाई केली.