Pune Ganeshotsav 2021: मोरया… मोरया’च्या जयघोषात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायाचे विसर्जन

Updated On:

पुणे – मोरया… मोरया’चा जयघोष, ध्वजाची सलामी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि भंडाऱ्यांची उधळण अशा वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या “श्रीं’ना निरोप देण्यात आला.

शहरातील प्रमुख गणेशोत्सव मंडळ असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायांचे विसर्जन दुपारी 2.30 वाजता झाले. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उत्सव मंडपात श्रींची आरती झाल्यानंतर विसर्जनाला सुरुवात झाली. “मोरया.. मोरया’च्या जयघोषात मूर्ती विसर्जन कुंडांकडे दाखल झाली. तर “पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणरायांना निरोप दिला. यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे यांसह मानाच्या आणि प्रमुख गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

विसर्जनापूर्वी गणरायांना “वाद्यवृंद’ या पथकाने ध्वजाची सलामी दिली. तर अखंडपणे चौघड्याचे वादन सुरू होते. यासह आरतीच्या वेळी मंदिरात कार्यकर्त्यांनी शंखनाद केला.

आणखी संबंधित बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा

2026-01-22 21:02:29

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा

Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे आयोजन

2025-05-18 05:59:54

Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे आयोजन

मंत्री गिरीश महाजन, अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री, अभिनेता राजपाल यादव यांसह अनेक दिग्गजांनी घेतले 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट'च्या बाप्पांचे दर्शन

2023-09-22 22:24:30

मंत्री गिरीश महाजन, अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री, अभिनेता राजपाल यादव यांसह अनेक दिग्गजांनी घेतले 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट'च्या बाप्पांचे दर्शन

Pune Ganeshotsav 2021: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे उत्साहात विसर्जन

2021-09-19 17:00:01

Pune Ganeshotsav 2021: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे उत्साहात विसर्जन

Pune Ganeshotsav 2021 : गणेशोत्सव साध्या पध्दतीने मात्र बंदोबस्त तगडाच

2021-09-08 22:20:13

Pune Ganeshotsav 2021 : गणेशोत्सव साध्या पध्दतीने मात्र बंदोबस्त तगडाच