Pune : पालक गमाविलेल्या बालकांना अर्थसहाय्य; ४५ लाखांचा निधी मंजूर
Updated On:

पुणे : करोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटांतील बालकांसाठी ४५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य शासनाकडून करोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी सन २०२४-२०२५ या वर्षासाठी अर्थसहाय्य देण्याच्या अनुषंगाने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने विशेष योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या योजनेसाठी वित्त विभागाने पुरवणी मागणीद्वारे निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी महिला व बाल विकास आयुक्त यांना वितरीत करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेवरील खर्चासाठी आयुक्तांना नियंत्रक अधिकारी म्हणून, तर लेखाधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबत महिला व बाल विकास विभागाचे कक्ष अधिकारी डॉ. नीलेश पाटील यांनी आदेश काढले आहेत.





