पुणे : ‘फेरफार’ : नवा प्रभाग क्र. 32 (जुना क्र. 10) भुसारी कॉलनी-सुतारदरा

पुणे (सागर येवले) – राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या या प्रभागात 2017 मध्ये बदल झाले आणि चारही नगरसेवक भाजपचे निवडून आले. त्यामुळे सध्या प्रभागात भाजपचे वर्चस्व असले तरी, नवीन प्रभाग रचनेमुळे पुन्हा सत्तेवर कोण विराजमान होणार याची उत्सुकता लागली आहे. नवीन प्रभाग रचना ही राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी अनुकूल असून त्यानुसार जिंकून येणाऱ्या उमेदवारांनाच प्रभागात संधी दिण्याचे धोरण अवलंबले जाणार आहे. यात उमेदवारी कोणाला मिळणार? आघाडी करून लढणार की स्वतंत्र?
प्रभागातील समाविष्ट भाग
भुसारी कॉलनी, सुतारदरा, दत्तनगर, सुतारदरा नगर, म्हातोबा नगर, पंडित भिमसेन जोशी उद्यान, डावी भुसारी कॉलनी, चिंतामणी पॅरेडाइज, मंगलधाम सोसायटी, नवभूमी, शास्त्रीनगर पार्ट, सौदामिनी अपार्टमेंट, वेदविहार सोसायटी-2, जिजाईनगर, महात्मा सोसायटी, वृंदावन सोसायटी, इंदिराशंकर नगरी आदी.
यावरही या प्रभागाची स्थिती अवलंबून आहे. राष्ट्रवादीला या प्रभागात वर्चस्व ठेवायचे असेल तर उमेदवाराची निवड आणि मित्र पक्षाची मदत महत्वाची ठरणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळेल, त्याबरोबर मनसे आणि कॉंग्रेसचे माजी आणि विद्यमान लोकप्रतिनिधी या प्रभागात आले तर लढत आणखी चुरशीची होईल.
विद्यमान नगरसेवक
गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेले विशेष कामशांतीबन चौक ते आशिष गार्डन रस्ता मार्गी लावला. प्रभागातील कचरा स्वखर्चाने उचलण्याचे काम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय राजा शिवछत्रपती क्रिडा संकुल उभारण्याचे काम अंतीम टप्यात आहे. स्वामी विवेकानंद जलतरण तलाव, मेडिटेशन हॉल व बॅडमिंटन कोर्टचे कामही पूर्ण होईल.किरण दगडेपाटील (भाजप)
बावधनमध्ये ई-लर्निंग स्कूल सुरू होत आहे. ज्येष्ठ नागरिक, मुलांसाठी उद्याने, वन उद्यान, ओपन जीम, ऍम्पी थिएटर उभारले. स्वर्गीय लता मंगेशकर आर्ट गॅलरी सुरू होते. एमपीएससी, युपीएससी ई-लॅब्ररी सुरू केली. महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र आणि रोजगारासाठी जागा उपलब्ध करून दिली.दिलीप वेडेपाटील (भाजप)
सावरकर मैदानाचा कायापालट केला. अशिष गार्डन, डुक्कर खिंड आणि डावी भुसारी डी.पी. रोडचे काम मार्गी लावले. 24 तास नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घेत सोडविल्या. स्वखर्चातून छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले. एमपीएससीची सुसज्ज अभ्यासिका उभारणार आहे.अल्पना वरपे
(भाजप)
कामधेनू सिद्धी समोरील मनपा मिनिटी स्पेसवर कै.आबा हर्षे उद्यान साकारण्यात आले. वंडरफ्युचरा सोसायटी ते महात्मा सोसायटी माझ्या विकास निधीतून पहिला महत्वाचा रस्ता करण्यात आला. गोपीनाथ नगर ते आशिष गार्डन चौक फुटपाथ व त्या फुटपाथ वर सुशोभिकरण करण्यात आले.डॉ. श्रध्दा प्रभुणे-पाठक (भाजप)
गतपंचवार्षिकचे लढवय्ये जनसेवक
प्रभागातील कामांबाबत त्यांचे मत…
प्रभागात एक मोठे विकासकाम दाखवा आणि एक लाख रूपये घेऊन जावा. रस्ते, उद्यान, मैदान, मोठी वॉटरलाइन यासह एकही काम केलेले नाही. कचऱ्यांचा ढीग वाढलेला आहे. विकासकामात मोठे भ्रष्टाचार झाले आहेत. रस्ते केल्याचे दाखविले मात्र प्रत्यक्षात रस्ता झालेलाच नाही.शंकर केमसे (राष्ट्रवादी)
जनतेच्या विकासासाठी आलेला निधी अनावश्यक कामांवर खर्च केला गेला. 2017 मध्ये उद्घाटन केलेली कामे पाच वर्षांत यांना पूर्ण करता आलेली नाहीत. विकासाच्या नावाखाली केवळ पोस्टरबॉय प्रमाणे चमकोगिरी करण्यातच पाच वर्षांचा काळ गेला, त्यातून जनतेच्या पदरी निराशाच पडली.कुणाल वेडेपाटील (राष्ट्रवादी)
गेल्या पाच वर्षांत विकासाच्या नावावर प्रभागाला भकास करण्याचे काम नगरसेवकांनी केले. एकही नवीन प्रकल्प आलेला नाही. तरुणांना रोजगार मिळावा यासाठी तळमळ नाही. महिलांसाठीही कोणताही प्रकल्प नाही. ठेकेदारीच्या माध्यमातून भ्रष्टाचार वाढलेला आहे.साधना डाकले (राष्ट्रवादी)
नागरिकांच्या आणि सर्वांगिण परिसराच्या हिताची विकासकामे केली, ती आजही सुस्थितीत आहे. त्यामध्ये मागील पाच वर्षांत फारसा बदल झालेला नाही. दुरदृष्टी ठेवून केलेले रस्ते, पदपथ, ड्रेनेजलाइनची कामे पूर्ण झाली. मात्र, आता नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.जयश्री मारणे (मनसे)
2022 निवडणुकीसाठी इच्छुक
भाजप : किरण दगडे, अल्पना वरपे, श्रध्दा प्रभुणे-पाठक, राजाभाऊ जोरी, स्वाती शरद मोहोळ, सचिन पवार, निलेश कोंढाळकर, संदीप कुंबरे, ऍड. रूपेश भोसले, ऍड. समीर जोरी, दत्ता भगत. राष्ट्रवादी कॉंग्रेस : शंकर केमसे, विजय डाकले, जयश्री मारणे, साधना डाकले, राजेंद्र उभे, मनिषा राजेंद्र उभे, राकेश मारणे. कॉंग्रेस : रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम, सागर कदम, किशोर मारणे. शिवसेना : अविनाश दंडवते, पराग पासलकर, सिमा चिकणे, अंकुश तिडके, ऍड. आनंद भिलारे, चंद्रकांत शिंदे. मनसे : पुष्पा कन्होजिया, किशोर शिंदे, रमेश उभे, सुभाष आमले, विराज डाकवे, किरण उभे, शाम बोऱ्हाडे, नितीन गायकवाड.





