Pune: हडपसरच्या विकासासाठी प्रशांत जगताप यांना निवडून द्या : शिवरकर

हडपसर – महापौर पदावर काम करताना प्रशांत जगताप यांना मी पाहिले आहे. दूरदृष्टीपणा, विकासाचे नियोजन, नागरिकांच्या समस्यांची जाण, सर्वसामान्य माणसाशी असलेला त्यांचा दांडगा संपर्क हडपसरच्या सर्वांगीण विकासासाठी लाभदायी ठरणार आहे. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रशांत जगताप यांना आमदार म्हणून निवडून देऊ या, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केले.
हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचाराची सांगता कात्रज ते मांजरी अशी भव्य बाइक रॅली व मांजरी येथील विजयी निर्धार सभेने झाली. यावेळी माजी उपमहापौर बंडुतात्या गायकवाड, निलेश मगर, माजी नगरसेवक योगेश ससाणे, वसंत मोरे.
दिलीपआबा तुपे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे, काँगेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप तुपे, शिवसेना उपशहर प्रमुख समीर तुपे, प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे ,गजेंद्र मोरे, शैलेश बेहेकर यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विविध पक्ष-संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने प्रशांत जगताप यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.
सोशल मीडियातून कौतुक…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी प्रशांत जगताप यांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक करीत पाठ थोपटणारे ट्विट केले आहे. तसेच, व्हिडिओच्या माध्यमातून प्रशांत जगताप यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहनही केले आहे.





