पुणे जिल्हा : किवत, शिंद, आळंदेतील तरुणांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

आमदार संग्राम थोपटे यांना वाढता पाठिंबा
भोर – भोर विधानसभा मतदारसंघातील भोर तालुक्यातील तरुणांचा आमदार संग्राम थोपटे यांना वाढता पाठिंबा मिळत असून तालुक्यातील किवत, शिंद आणि आळंदे गावांतील १०० पेक्षा अधिक तरुणांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश करुन आमदार संग्राम थोपटे यांच्या विजयासाठी मतदान करण्याची शपथ घेतली आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संग्राम थोपटे यांनी या सर्व तरुणांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. भविष्यात सन्मानाची वागणूक दिली जाईल, असे अश्वासन दिले आहे.
यामध्ये शिंद गावचे उत्तम खुटवड यांच्यासह मौजे किवत गावचे संजय चंदनशिव, माजी उपसरपंच गोरक्षनाथ बदक, हरीश खोपडे, संदीप चंदनशिव, रोहिदास चंदनशिव, लहू चंदनशिव, रामदास धापते, ग्रामपंचायत सदस्य योगेश चंदनशिव, विजय चंदनशिव, पंकज चंदनशिव, दत्तात्रय चंदनशिव, सुयोग चंदनशिव, तलेश राजेशिर्के,
संदीप चंदनशिव, उमेश पवार, रमेश पवार, किशोर पवार, धीरज पवार, बळीराम मोरे, मुकुंद मोरे, दयाराम मोरे, शेखर जाधव, अक्षय चंदनशिव, सोमनाथ चंदनशिव, सचिन बदक, अमोल बदक, अमोल चिकने, विकास जाधव, नवनाथ चंदनशिव, गुलाब चंदनशिव आदि तरुणांसह आळंदे गांवचे मयुर गुजर, महेश गुंड,ओंकार सणस, रवींद्र शेडगे आदी युवकांनी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.
याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, पोपटराव सुके, किशोर बांदल, अमर राजेशिर्के, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दामगुडे, चेअरमन अतुल शेडगे, शिंद गावचे सरपंच शंकर माने, अंकुश खंडाळे, हेमंत दाभाडे, दीपक कुमकर, अमर शेडगे, सुनील आवाळे, दत्तात्रय गावडे, रामदास चंदनशिव, किसन कोंढाळकर, हरिदास खाटपे, अक्षय कुमकर, तंटामुक्ती अध्यक्ष महमूद भाई शेख, चंद्रकांत चंदनशिव, प्रथमेश बांदल, संदीप खोपडे, प्रसन्न बांदल, ज्ञानदत्त बांदल, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.





