कापूरहोळ : पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी ते सारोळा दरम्यान जागोजागी बेकायदेशीरपणे पुण्यातील व्यावसायिकांनी दुभाजक तोडले होते. त्यामुळे महामार्गावर अपघातात वाढ झाली होती. महामार्गावरील ठिकठिकाणी तोडलेले बेकायदेशीर दुभाजकांची दुरुस्ती करण्याच्या कामास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. शिंदेवाडी ते सारोळा महामार्गावर गेली अनेक वर्षांपासून राजरोसपणे दुभाजक तोडले जात आहेत. व्यावसायिक आणि अधिकारी यांच्यातील मैत्रपूर्ण संबंधातून हे घडत असल्याची नागरिकांत चर्चा आहे. पुढील काळात हे दुभाजक पुन्हा तोडण्यात येणार नाहीत, याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विशेष लक्ष देणार काय आणि तोडलेच तर त्यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.