मंचर : आंबेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले असून त्या पद्धतीने कार्यवाही सुरू झाली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पाटील यांनी मंगळवार, दि. २७ रोजी दिली. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी नायब तहसीलदार शांताराम किर्वे, मंडळ अधिकारी भाऊसाहेब शिंदे, तलाठी शशांक चौदंते याच्यासह पाहणी दौरा केला. यामध्ये प्रामुख्याने वडगावपीर येथील गुळवेवस्ती रस्ते, पोखरकरमळा क्र.२ येथील राहते घराची दुरावस्था, वाळुंजनगर येथील स्मशानभूमी जवळील भाग, वाहतुकीचे रस्ते, राहते घर तसेच अनेक शेतीबांधांचे झालेल्या नुकसानीचा पाहणी केली. यावेळी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज,आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सदस्य रवींद्र करंजखेले, शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, माजी सरपंच उद्धव लंके, उद्योजक वसंत पडवळ, बाळशीराम वाळुंज, बाळासाहेब भोर, संजय पोखरकर, अण्णा पोखरकर, सुमित वाळुंज तसेच सहकारी उपस्थित होते.