पुणे जिल्हा : स्त्रियांचा सन्मान म्हणजे स्त्रियांचा अधिकार

डॉ. नीलमताई गोऱ्हे : शिवसेनेची महाविजय संवाद यात्रा
राजगुरूनगर – स्रियांचा सन्मान म्हणजे स्त्रियांचे अधिकार आहे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या विजय संवाद यात्रेत शिवसेना नेत्या डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात शिवसेना नेत्या, विधान परिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी राजगुरूनगर येथे संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी सारिका पवार, मनिषा पलांडे, पूजा राक्षे, सुदर्शना त्रिगुणाईत, शैला पाचपुते, शेतकरी नेते गणेश सांडभोर उपस्थित होते.
मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजनेतील लाभार्थी आपला आनंद आहे. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे व्यक्त केला. योजनेतून प्राप्त झालेल्या निधीतून बहीणींनी दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी केल्या तर काही महिलांनी आपल्या व्यवसायाला या निधीचा मोठा हातभार लागल्याचे यावेळी महिलांनी गोऱ्हे यांना सांगितले.
गोऱ्हे म्हणाल्या, आनंदाचा शिधा, लाडकी बहीण सन्मान योजना, वयोश्री योजना तसेच वयोवृद्ध व्यक्ती साठी तीर्थक्षेत्र पर्यंटन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात यशस्वीपणे राबवल्या आहेत. भविष्यातही यासारख्या अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी आपणास धनुष्यबाणावर उभ्या असलेल्या उमेदवारांना निवडून आणायचे आहे.
यावेळी महायुतीला २ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने सरकारच्या अनेक योजनांच्या महिला संवाद आणि महाविजय संवाद पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले.





