Pune District : महिलांना योग्य दिशा, पाठबळ देण्याची गरज

राजगुरुनगर : महिला सर्व क्षेत्रात आपली कर्तबगारी सिद्ध करू शकतात त्यासाठी त्यांना योग्य दिशा आणि पाठबळ देण्याची गरज आहे. म्हणूनच आम्ही गेली 4 वर्षापूर्वी भामा खोर्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी भामाई महिला सक्षमीकरण अभियान सुरू केले आहे, अशी माहिती अभियानाच्या मुख्य संयोजिका सुनिता शरद बुट्टे पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांच्या 49 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभियानाच्या माध्यमातून पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटातील महिला स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव आणि महिला ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी सुनिता बुट्टे पाटील बोलत होत्या. कार्यक्रमप्रसंगी पाऊस सुरू असताना देखील 338 बचत गटाचे 800 पेक्षा महिला प्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सोनाली अवचट (जिल्हा व्यवस्थापक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) यांनी बचत गटासाठीच्या कार्यपद्धती, अनुदान योजना आणि व्यवसाय योजना यांची सविस्तर माहिती दिली.
भामाईचे माध्यमातून, बचत गटांना त्यांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी ऑफिस बॅग देण्यात आली. यावेळी शिवाकाली खेंगले यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान दिले. यावेळी शरद बुट्टे पाटील, भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष किरण राक्षे राजगुरूनगरचे माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा ठाकर, भामाईचे मुख्य संयोजिका सुनिता बुट्टे पाटील, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय टेमगिरे, खेड ग्रामीण मंडल अध्यक्ष सुनील देवकर, जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ, काळूराम पिंजन,रामदास कोळेकर, रोहित डावरे पाटील, दत्तात्रय मांडेकर, रामदास खेंगले, नवनाथ दरेकर, शिवाजी डावरे, शरद निखाडे, सत्यवान पानमंद, भरत रौंधळ, आनंदा आवारी, पोपट राळे, काळूराम राळे, महेश हाबडे, शामराव रौंधळ, नीलेश घुमटकर, हिरामण रौंधळ, भाऊ कुडेकर, अभिजीत माळवदकर (पंचायत समिती बचत गट – कस्टर को ऑर्डीनेटर) यांच्यासह महिला सरपंच शीतल पिंजण (भांबोली), पूजा बुट्टे पाटील (वराळे), रूपाली कारले (चांदुस), जया कड (किवळे), वैशाली काळे (गोणवडी), प्रमिला काचोळे (रोहकल), वेनूबाई बोंबले (तळवडे), अश्विनी कुडेकर (अनावले कासारी), रुक्मिणी लिंभोरे (आसखेड खुर्द), निखिता गावडे (कारंजविहिरे), वैशाली जरे (वाकी बुद्रुक), उपसरपंच सुनंदा निखाडे (भांबोली), कल्पना पवार (बिरदवडी) आदी उपस्थित होते.
भामाईचे संयोजिका रत्नमाला पिंगळे, आशा लाड, सुषमा राळे, सारिका वाळुंज, पूजा कुंभार, ज्योती कुंभार, भारती डांगले, अहिल्या पडवळ, कांचन आंद्रे, वैशाली कचाटे, सुनिता शिवेकर, सोनल जारे, शारदा वाळुंज, वैशाली टोपे, माया जावळे, सुवर्णा खेंगले, सुनिता वाळके, निर्मला पानमंद, शिल्पा चामवाड, कामिनी गोगावले, कुंदा डावरे, प्रियांका राळे, मनिषा रौंधळ, अक्षदा देशमुख, हर्षदा राळे, ललिता पडवळ या महिलांनी हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करणेसाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता पाचारणे यांनी तर प्रा.बबन डांगले यांनी आभार मानले.
काही कामे ही राजकीय पक्ष आणि राजकीय स्पर्धेच्या पलीकडे जाऊन करायचे असतात. त्यामुळेच आम्ही गेल्या चार वर्षात महिलांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले, महिला लोकप्रतींचे प्रशिक्षण घेतले. भाषण कलेच्या कार्यशाळा घेतल्या,त्यांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. उत्कृष्ट काम करणारे आणि विविध व्यवसाय करणारे 13 महिला बचत गटांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
– शरद बुट्टे पाटील, माजी सभापती, जिल्हा परिषद





