पुणे जिल्हा : महिलेला बोलण्यात गुंतवून ७८ हजाराचे दागिने लंपास

शिरुर : शिरूर शहरातील हॉटेल्स श्रेयांसमोरील पुलावर रस्त्याने जाणाऱ्या वाटसरू महिलेला बोलावून ‘ आमच्याकडे पैसे असून ते अर्धे अर्धे आपण वाटून घेऊ ‘ असे सांगून महिलेला भुरळ पाडून हातचलाखीने तिच्या कानातील व गळ्यातील मंगळसूत्र असा ७८ हजाराचा ऐवज दोन तरुण चोरट्यांनी चोरून नेला आहे.
याबाबत छबुबाई नारायण बनसोडे, (वय ५५ वर्षे,) रा . पाचर्णेमळा, शिरूर यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असून याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे दोन अनोळखी तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २९ नोव्हेंबर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिरूरच्या सुजरनगर येथील हॉटेल श्रेयांश शेजारील पुलावर जुना पुणे – शिरूर हायवे रोडवर, हॉटेल जोगेश्वरी समोर अशा अंतरात छबुबाई बनसोडे या महिलेला दोन अनोळखी तरुणांनी आजी म्हणुन बोलावुन घेवुन बोलण्यामध्ये गुंतवुन महिलेला आमच्याकडे रुमालात पैसे आहे.
हे वाटून घ्यायचे असे सांगून महिलेची दिशाभुल करून महिलेला भुरळ पाडून तिच्या कानातील दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कर्णफुले, वेल व गळ्यातील तीन ग्रॅम चे मंगळसूत्र असा एकूण ७८ हजार रुपये ऐवज घेऊन पसार झाले. या तरुणांचे अंदाजे वय पंचवीस असल्याचे महिलेने फिर्यादीत सांगितले असून, शिरूर पोलीस स्टेशन येथे तरुणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगताप करीत आहे.





