पुणे जिल्हा : अनुयायांचे स्वागत करणे ही कौतुकास्पद बाब – अंकित गोयल

कोरेगाव परिसरात सीएसआर मधून हायमास्ट तात्काळ बसवून देवू
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा येथे पुणे नगर बाजूकडून मोठ्या संख्येने भीम अनुयायी येत असल्याने बार्टि संस्थेकडून अतिरिक्त निधी कसा मिळेलख, याचा विचार करताना सीएसआरमधून हायमास्ट तात्काळ बसवून देऊ, असे आश्वासन देत मानवंदना देण्यासाठी येणार्या अनुयायांचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेत असतात ही बाब कौतुकास्पद असल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.
1 जानेवारी 2024 विजय स्थंभ मानवंदना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी हरेश सूळ, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव वाबळे,
पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सरपंच विक्रम गव्हाणे, माजी सरपंच नवनाथ माळी, सदस्य केशव फडतरे, संपत गव्हाणे, भानुदास सरडे, सत्यनारायण ढेरंगे, राजेंद्र गवदे, बन्सी फडतरे, दीक्षांत भालेराव, ग्रामविकास अधिकारी रतन दवणे, तलाठी विशाल काळे, पोलिस पाटील मालन गव्हाणे, नितीन ढोरे यांसह आदी उपस्थित होते.
यावेळी केशव फडतरे, राजेंद्र गवदे, संपत गव्हाणे यांनी कोरेगाव भीमाच्या समस्यांवर बोलताना तत्कालीन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नदीला संरक्षक घाट, बहुउद्देशीय इमारत, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी बाबी पूर्ण करण्याचा शब्द दिला होता; मात्र आजपर्यंत कोणतीही मदत प्रशासनाने ग्रामस्थांना केली नसल्याची खंत व्यक्त केली. तर नितीन ढोरे यांनी वाडागाव फाटा येथे हायमास्ट, सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली.





