पुणे जिल्हा : आरण ते गोजुबावी पायी ज्योत सोहळ्याचे स्वागत

काटेवाडी : श्री संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त गोजुबावीत आरण ते गोजुबावी पायी ज्योत सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले स्वागत.
आपल्या कामामध्ये पांडुरंग पाहणारे श्री संत सावतामाळी यांची आज पुण्यतिथी. श्री संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथी च्या निमित्ताने गोजुबावीत श्री क्षेत्र आरण ते गोजुबावी असे 150 किलोमीटर अंतर पायी ज्योत घेऊन संत सावतामाळी तरुण मंडळ जाधववस्ती, गोजुबावी यांनी पार केले. या पायी ज्योतीचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर उपस्थित होते. त्यांनी भक्तिभावाने ज्योतीचे स्वागत केले. यावेळी गोजुबावीतील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक महिलांनी ज्योतीचे स्वागत करत तरुणांचे औक्षण केले. हा पायी ज्योत सोहळा गेली 15 वर्ष झाले गोजुबावीत साजरा होत आहे. यावेळी अनेक कार्यक्रम पार पडतात. यावेळी मालन आटोळे यांचे प्रवचन होणार आहे तर संध्याकाळी हभप डॉ. प्रसाद महाराज साळूखे यांचे कीर्तन होणार आहे.
तसेच संत सावतामाळी तरुण मंडळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी किशोर जाधव, पांडुरंग जाधव, सुनील जाधव, भाऊसो जाधव, सचिन जाधव, खंडू जाधव, बाबासो जाधव, नितीन जाधव तसेच अन्य अनेक व्यक्ती उपस्थित होते.





