पुणे जिल्हा : भ्रष्ट राजवट उलथवून टाकायचीय

मेहबूब शेख : इंदापुरात भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या दहीहंडी जल्लोषात
इंदापूर : भगवान श्री कृष्णाच्या जन्माने सर्वत्र आनंद झाला आणि भगवान श्रीकृष्णाने कंस मामाची राजवट उलथवून टाकली. त्याच पद्धतीची भ्रष्ट राजवट, येणार्या विधानसभा निवडणुकीत इंदापूर व राज्यातील उलथवून टाकायची आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले.
शहरात भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने गुरुवारी (दि. 29) आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात तीन तीन वेळा दहीहंडी संघाना मनोरे करावे लागले. दहीहंडीची उंची अधिक असल्याने अडीच तास प्रयत्न करून देखील कोणत्याही संघाला दहीहंडी पर्यंत पोहचता आले नाही. अखेर तिसर्या प्रयत्नात शहरातील तिरंगा दहीहंडी संघाने दहीहंडी फोडली आणि रात्री उशिरा हजारो गोपाळांनी गोपाल काला गोड झाला, या गजरात दहीहंडी महोत्सव उत्साहात साजरा केला. त्यावेळी शेख यांनी गोलापांना वरील आवाहन केले.
यावेळी सिनेअभिनेत्री मानसी नाईक व रशियन कलाकार आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. यावेळी दहीहंडी उत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, अकलूजचे सरपंच शिवबाबा मोहिते पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव विधीज्ञ राहुल मखरे, राष्ट्रवादीचे अमोल भिसे, तालुकाध्यक्ष विधीज्ञ तेजसिंह पाटील, आरपीआयचे शिवाजीराव मखरे, संदीपान कडवळे, नगराध्यक्षा अंकिता शहा, वैशाली शहा, रुचिरा अंगद शहा, शहा ग्लोबल स्कूलचे व्यवस्थापक अंगद शहा व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महात्मा फुले दहीहंडी संघ, तिरंगा दहीहंडी संघ, शिवशंभो दहीहंडी संघ,नेताजी दहीहंडी संघ,छत्रपती शिवाजी दहीहंडी,स्वराज्य दहीहंडी संघ यांनी सहभाग घेतला होता.त्या सर्व संघाना सलामीला भरत शहा मित्र परिवाराच्या वतीने सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी नंदकुमार गुजर,डॉ.संजय शहा, डॉ. श्रेणिक शहा,संजय दोशी,गणेश महाजन, विधीज्ञ राकेश शुक्ल, विलास माने, रामकृष्ण मोरे, रवी सरडे, विधीज्ञ आशुतोष भोसले, आनंद केकाण, पोपट पवार, अंकुश माने, विनायक बाब्रस, गजानन गवळी, संदीप पाटील, शकील सय्यद, फिरोज पठाण, बिल्डर मोहसीन शेख, प्रशांत उंबरे, निखील महाजन, श्रीकांत माने, रश्मी शेख, उमेश ढावरे व भरत शहा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी आप्पासाहेब जगदाळे यांनी शुभेच्छा दिल्या, तर मुकुंद शहा यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
भरत शहा यांचा अभिमान
ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीत अमित शहा यांना घाबरून भाजपामध्ये जात होते. त्यावेळेला इंदापूरचे भरत शहा मात्र शरद पवार यांना साथ देण्यासाठी आले. त्यामुळे भरत शहा यांचा मला अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले.





