Pune District : जलवाहिनी फुटल्याने भोरला आज पाणीपुरवठा बंद
Updated On:

भोर : भोर शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी भाटघर येथे फुटल्याने उद्या (दि.१६) रोजी शहरातील मुख्य भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
भोर शहरातील मंगळवार पेठ, श्रीपती नगर, नवी आळी, वेताळपेठ, धुमाळ नगर, चौपाटी, रामबाग, बजरंग आळी, विद्या नगर, संजय नगर, वाघजाई नगर, म्हस्के नगर, या भागात पाणी पुरवठा केला जाणार नाही, तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन भोर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.





