Pune District: गांजा विक्रीबाबत वाघोली पोलिसांची कारवाई
Updated On:

वाघोली : वाघोली येथील गोरे वस्तीकडे जाणार्या रोडवर गांजा विक्रीबाबत वाघोली पोलिसांनी कारवाई केली असून गांजा विक्रीसाठी घेणारे तिघे व विकणारा अशा चौघांवर एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागेश लष्करे, रिजवान शेख, महेश गायकवाड (तिघे रा. वाघोली), सौरभ तपासे (रा. हिंगणघाट, वर्धा) असे असे गांजा विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाघोली पोलिसांचे पथक गोरेवस्ती कडे जात असताना पोलिसांना चौघे संशयास्पद आढळून आले.
पोलिसांना पाहून त्यातील दोघे फरार झाले तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 904 ग्रॅम गांजा व दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. वाघोलीतील तिघांनी तपासे याच्याकडून गांजा विक्रीसाठी घेतला होता.





