वाघोलीतील कटके यांना 74.60 तर पवार यांना 22.40 टक्के मते वाघोली : शिरूर-हवेली विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शिरूर-हवेली मतदार संघामध्ये 74550 मतांची आघाडी घेऊन दणदणीत विजय मिळविला आहे. कटके यांना पोस्टल मतासह 1 लाख 92 हजार 281 मते मिळाली आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांना पोस्टल मतासह 1 लाख 17 हजार 731 मते मिळाली आहेत. भूमिपुत्र असलेल्या कटके यांच्या पारड्यात वाघोलीकारांनी भरभरून मते टाकली आहेत. संपूर्ण मतदार संघामध्ये सर्वाधिक मतदान झाले असून एकट्या वाघोलीत 20 हजार 598 मतांची आघाडी मिळाली आहे. वाघोलीत पवार यांना 8 हजार 844 मते मिळाली तर कटके यांना 29 हजार 443 मते मिळाली आहेत. वाघोलीतील एकाही बुथवर अशोक पवार यांना आघाडी मिळविता आली नाही. आव्हाळवाडी, केसनंद, पेरणे, लोणीकंद, अष्टापूर, कोलवडी, वाडेबोल्हाई, पिंपरी सांडस, डोंगरगाव व परिसरातील गावांनीही कटके यांना सर्वाधिक आघाडी दिली आहे. वाघोली परिसरात कटके व पवार यांना पडलेली मते गावाचे नाव, पवार, कटके, आघाडी (उमेदवार) वाघोली, 8844, 29443, 20599 (कटके) केसनंद+तळेरानवाडी, 2079, 4875, 2796 (कटके) पेरणे, 1437, 3382, 1945 (कटके) लोणीकंद, 1693, 3055, 1362 (कटके) आव्हाळवाडी, 1025, 3471, 2446, (कटके) कोलवडी, 1458, 3187 1729 (कटके) साष्टे, 235, 759, 524 (कटके) वाडेबोल्हाई, 1113, 1654, 541 (कटके) पिंपरी सांडस, 840, 1269, 429 (कटके) अष्टापूर, 830, 1202, 372 (कटके) तुळापूर, 685, 1049, 364 (कटके) डोंगरगाव, 627, 1114, 487 (कटके) फुलगाव, 507, 1020, 513 (कटके) वढू खुर्द, 839, 1041, 202 (कटके) बुर्केगाव, 607, 688, 81 (कटके) शिरसवडी, 574, 606, 32 (कटके) हिंगणगाव, 455, 596, 141 (कटके) बकोरी, 373, 895, 522 (कटके) शिंदेवाडी, 313, 566, 253 (कटके) बिवरी, 350, 356, 6 (कटके) न्हावी सांडस, 614, 409, 205 (पवार) सांगवी सांडस, 378, 411, 33 (कटके