Pune District : खेडवासीयांची सोडतीकडे पाठ

162 पैकी 103 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे फेर आरक्षण जाहीर
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील 162 पैकी 103 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची फेर आरक्षण सोडत पुन्हा नव्याने सोमवारी (दि. 7) राजगुरूनगर येथे काढण्यात आली. तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी यांनी सरपंचपदाच्या सोडतीकडे पाठ फिरवली. तर काही निवडक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य त्यांचे समर्थक आरक्षण सोडतीला उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे सरपंच पदासाठी महिलांना 50 टक्के आरक्षण असताना त्यांनी आरक्षण सोडतीकडे दुर्लक्ष केले.
2025 ते 2030 या कालावधीत होणार्या ग्रामपंचायतीच्यासरपंच पदासाठी दि. 23 एप्रिल रोजी सोडत काढण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडून पुन्हा सोडत घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले होते त्यानुसार सोमवारी (दि. 7) पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात आली.
खेड तालुक्यातील 162 पैकी जिल्हाधिकारी कार्यालयात 18 आणि दि. 23 एप्रिल 2023 रोजीच्या आरक्षणात अनुसूचित जाती जमाती क्षेत्रातील 41 ग्रामपंचायतींचे आरक्षण कायम ठेवण्यात आले. उर्वरित 103 ग्रामपंचायती पैकी सरपंचपदाची आरक्षण सोडत तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नायब तहसीलदार राम बीजे, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे उपस्थित होते. 2 लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठ्याद्वारे आरक्षण काढण्यात आले.
खेड तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण :
अनुसूचित जमाती महिलांसाठी निश्चित ग्रामपंचायती : कुडे बुद्रुक, खरपुड, घोटवडी, टोकावडे, धामणगाव खुर्द. धुवोली, परसुल, भोरगिरी, शेंदुर्ली, नायफड, आव्हाट.
अनुसूचित जमाती सर्वसाधारण ग्रामपंचायती : सुरकूंडी, साकुर्डी, शिरगाव, वांद्रा, मोरोशी, भोमाळे, गोरेगाव, खरोशी, डेहणे, एकलहरे.
अनुसूचित जाती महिला ग्रामपंचायती : निघोजे, मरकळ, शिंदे, चास, सुपे.
अनुसूचित जाती खुला वर्ग ग्रामपंचायती : वहागाव, कळमोडी, चिखलगाव, तिफनवाडी.
अनुसूचित जमाती महिला ग्रामपंचायती : दावडी, गारगोटेवाडी, खरपुडी खुर्द, औंढे, मिरजेवाडी, आंभू.
अनुसूचित जमाती खुला वर्ग ग्रामपंचायती : दरकवाडी, नाणेकरवाडी, तुकाईवाडी, आहिरे, आडगाव.
नागरिकांचा मागासवर्ग महिला ग्रामपंचायती : साबळेवाडी, कोयाळी तर्फे वाडा, वाकी खुर्द, कान्हेवाडी बुद्रुक, शिरोली, रासे, मेदनकरवाडी, दौंडकरवाडी, शिवे, भोसे, वाजवणे, चिंचबाईवाडी, वरची भांबुरवाडी, कुरकुंडी, कान्हेवाडी तर्फे चाकण, सातकरस्थळ, जऊळके बुद्रुक.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग खुला वर्ग ग्रामपंचायती : देवोशी, कनेरसर, करंजविहीरे, रोहकल, वाडा, कडधे, मोई. निमगाव, पिंपरी बुद्रुक, भाम्बोली, हेंद्रूज, चांडोली, बिरदवडी, सांडभोरवाडी, वरुडे.
सर्वसाधारण महिला राखीव : जैदवाडी, आसखेड खुर्द, वराळे, औदर, गोसासी, रानमळा, दोंदे, देशमुखवाडी, शेलू, कमान, कडूस, वाळद, वडगाव नजीक खेड, गोनवडी, धानोरे, होलेवाडी, गोलेगाव- पिंपळगाव, येनिये बुद्रुक, चिंचोली, वाफगाव, पिंपळगाव तर्फे खेड, कोयाळी तर्फे चाकण, पाडळी, चांदूस, सिद्देगव्हाण, किवळे, पापळवाडी, वाकी बुद्रुक,खरपुडी बुद्रुक, तोरणे बुद्रुक, कोहिनकरवाडी, गडद, वाकळवाडी ढोरे भांबुरवाडी, सावरदरी.
सर्वसाधारण ग्रामपंचायती : साबूर्डी, बीबी, बहिरवाडी, वेताळे, येणिये खुर्द, तळवडे, वाघू, मोहकल, वि-हाम, कोळीये, वासुली, रेटवडी, सांगुर्डी, पाळू, म्हाळुंगे, पांगरी, केळगाव, चिंबळी, कुरुळी, अनावळे, शेलगाव, काळूस, बहुळ, टाकळकरवाडी, मांजरेवाडी, आखारवाडी, राक्षेवाडी, कोरेगाव बुद्रुक, कुडे खुर्द, गाडकवाडी. संतोषनगर, येलवाडी, कोरेगाव खुर्दर आंबोली, चर्होली खुर्द, पूर.
या ग्रामपंचायतींची यापूर्वी काढली होती सोडत
खेड तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीची सरपंचपद आरक्षण सोडत यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. यात खराबवाडी, जऊळके खुर्द, कोहिडे बुद्रुक, सोळू, वडगाव घेनंद, धामणे, गुळाणी, रौंधळवाडी, आसखेड बुद्रुक, आंबेठाण, वाशेरे, सायगाव, कडाचीवाडी, बोरदरा, पाईट, कोये, खालूंब्रे, टेकवडी या ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत काढण्यात आली होते.





