Pune District : गाव पातळीवरील कार्यकर्ता हा भाजपची ताकद

मंचर : भारतीय जनता पक्षांत पक्ष संघटनेला फार महत्त्व आहे. गाव पातळीवरील कार्यकर्ता हा भाजपसाठी महत्त्वाचा दुवा आणि ताकद आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नवनाथ पडळकर यांनी केले. पक्ष संघटना बांधणीला सर्वाधिक महत्त्व असल्यामुळे त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पदे देऊन काम करण्याची संधी दिली जाते. याची नोंद कार्यकर्त्यांनी घेऊन पक्ष संघटना वाढीसाठी आपला वेळ द्यावा, असे आवाहनही पडळकर यांनी केले.
आंबेगाव विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वामध्ये पक्षाने केलेल्या कामांचा आढावा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे घेण्यात आला.
त्यासाठी आंबेगाव तालुक्यात तीन बैठका घेण्यात आल्या. देशामध्ये बूथ अध्यक्ष पासून ते राष्ट्रीय अध्यक्षपर्यंत सर्व निवडी नव्याने होणार असून तालुक्यातील सर्व पदाधिकारी निवडी नव्याने करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती तालुकाध्यक्ष संदीप बाणखेले यांनी दिली.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. ताराचंद कराळे, जयसिंग एरंडे, श्रीकृष्ण देशमुख, संजय रौंदळ, शिरूर बेटचे अध्यक्ष मारुती शेळके, प्रमोद बाणखेले, राजेश काळे, स्वप्ना पिंगळे, अशोक गभाले, किरण पोखरकर, किरण वाळुंज, अरविंद वळसे पाटील, गणेश बाणखेले, योगेश बोऱ्हाडे इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठका करण्यात आल्या.





