Pune District : चैतन्य विद्यालयाच्या गणरायाला विविध पथकांनी दिली मानवंदना
Updated On:

ओतूर – जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील ग्राम विकास मंडळ संचलित चैतन्य विद्यालयाच्या गणपती बाप्पाला सातव्या दिवशी मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, विविध पथकांचे कलाप्रदर्शन आणि शिस्तबद्ध मिरवणूक यामुळे वातावरण भक्तिमय झाले असल्याचे मुख्याध्यपक राजश्री भालेकर यांनी सांगितले.
यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल पथक, झेंडा पथक, झांज पथक, छावा थीम पथक, लेझीम पथक, विविध वेशभूषा, आदिवासी नृत्य, जोगवा, हवा हवाई पथक, टाळ पथक, पर्यावरण पथक, व्यसनमुक्ती पथक आणि स्वयंसेवक पथक अशा विविध पथकांचा समावेश होता.
या सर्व पथकांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली आणि संपूर्ण ओतूर परिसर ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमून गेला. चैतन्य विद्यालयाने आयोजित केलेली ही मिरवणूक शिस्तबद्धतेमुळे लक्षवेधी ठरली.





