Pune District : कायद्याचा वापर करून अन्यायाविरुद्ध आवाज उठवा

न्यायाधीश नम्रता बिरादार : सबनीस विद्यालयात कायदेविषयक शिबिर
नारायणगाव : सामाजिक जीवनात जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हातेव्हा कायद्याचा वापर करून अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवा. गरज पडल्यास कायद्याचा आधार घेऊन पोलीस व वकीलांची मदत घेउन योग्य मार्गाने न्याय मिळवा, असे प्रतिपादन न्यायाधीश नम्रता महादेव बिरादार यांनी केले.
तालुका विधी सेवा समितीच्या एस. एस. नायर, तालुका विधी सेवा समिती जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली रा. प. सबनीस विद्यालयात आयोजित कायदेविषयक शिबिरात बिरादर बोलत होत्या. या प्रसंगी जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शिवदास तांबे, सचिव अॅड. आशिष वानखेडे, अॅड. सचिन चव्हाण, अॅड. निर्णया गाडेकर, अॅड. राजेंद्र कोल्हे,
अॅड. आरती नलावडे, अॅड.मनोबल चासकर, अॅड. रोमन, अॅड. अभिषेक भुजबळ, अॅड. मंजिरी कोल्हे, अॅड. मिथीलेश शिंदे, गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदीरच्या मुख्याध्यापिका सुषमा वाळींबे, कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर, उपप्राचार्य हनुमंत काळे, न्यायालयीन कर्मचारी प्रशांत मोरतळे, शिपाई जालींदर शिंगोटे, शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमात बेटी बचाओ बेटी पढाओ विषयावर अॅड. निर्णया गाडेकर, पोस्को कायदा जागरुकता अॅड. राजेंद्र कोल्हे, जागतिक आंतराष्ट्रीय न्याय दिन अॅड. आरती नलावडे तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध अॅड. सचिन चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. प्रवीण मदगुले यांनी प्रस्तावना अध्यक्ष अॅड. शिवदास तांबे यांनी तर मुख्याध्यापिका सुषमा वाळींबे यांनी आभार केले.





