पुणे जिल्हा: नेता भूमिकेतील छायाचित्राचे अनावरण

बारामती : शरद पवार यांनी “पडले सावरले, नाटकात नेता भूमिकेच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले.
बारामती – बारामतीच्या सांस्कृतिक वैभवाचा वारसा जपत सलेल्या नटराज नाट्य कला मंडळांने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कलादालनात शरद पवार यांनी “पडले सावरले, या नाटकात केलेल्या नेता या भूमिकेचे छायाचित्र प्रदर्शित केले. विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त विठ्ठलशेठ मणियार यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले.
शरद पवार यांनी १९५८ साली बीएमसीसी महाविद्यालयात स्नेहसंमेलनात “पडले सावरले” या नाटकात “नेता” ही भूमिका साकारली होती. त्या आठवणीचा ठेवा म्हणून नटराज नाट्य कलादालत हे छायाचित्र लावण्यात आले आहे. साहेबांचा हा वेगळा पैलू तरुण पिढीस समजेल, असे मत शरद पवार यांचे वर्गमित्र विठ्ठलशेठ मणियार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी माधव जोशी, इसाक बागवान, पौर्णिमा तावरे, संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर, नीलिमा गुजर, डॉ. राजेंद्र शहा, अभिजीत जाधव, सुधीर पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
रविवारपासून राज्यस्तरीय एकांकिका
नटराज नाट्य कला मंडळ संस्थेच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गेली 36 वर्षे राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यावर्षीच्या एकांकिका स्पर्धा दि.१७ व १८ रोजी होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली आहे.
निराधारांना मायेची ऊब
शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नटराज नाट्यकला मंडळाच्या वतीने मध्यरात्री शहरातील फुटपाथ, बसस्थानक, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, भाजी मंडई, मंदिर, मज्जिद, समाज मंदिरे, इमारती बाहेर परिसरात झोपी गेलेल्या नागरिकांच्या अंगावर ब्लॅंकेट टाकून त्यांचे थंडीपासून संरक्षण केले. संस्थेच्या माध्यमातून गेली चार वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे.





