पुणे जिल्हा : उंचखडकचे उपोषण तिसर्या दिवशी मागे

तहसीलदार, गटविकास अधिकार्यांची मध्यस्थी यशस्वी
तहसीलदार सुनील शेळकेंकडून रस्त्याची पाहणी
राजुरी : उंचखडक (ता.जुन्नर) येथे सुरू असलेले उपोषण जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके व जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या मध्यस्थीनंतर तिस-या दिवशीलिंबू पाणी देऊन उपोषणास सोडले.
उंचखडक ते आबाटेक रस्त्यातील अडथळा दुर करणे, आबाटेक वस्तीवरील पिण्याच्या पाण्याची तीन ते चार वर्षे सोय नसणे, 15 व्या वित्त आयोग प्राप्त निधी खर्च न करणे या मागण्यांसाठी सुनिल मारूती कणसे व ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. या उपोषणाची प्रशासनाने दखल घेत तहसीलदार सुनिल शेळके, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी भेट देत, समस्या समजुन घेतल्या.
यामध्ये विशेष करून गेल्या 20 ते 25 वर्षांपासून प्रलंबित असणा-या आबाटेक ते उंचखडक या रस्त्याचे काम रखडले होते. हा प्रश्न सोडवण्यात तालुक्याचे सुनील शेळके यांना यश आले आहे. तहसीलदार शेळके यांनी स्वत: या ठिकाणी वेळ देऊन अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेला रस्त्याच्या प्रश्न सोडवल्या बद्दल येथील ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला.तसेच गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी उपोषण ग्रामस्थांच्या ज्या मागण्या आहेत. त्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील असे सांगितले.
उपोषण दरम्यान आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद लेंडे, जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी, उपसरपंच माऊली शेळके, समर्थ एज्युकेशनचे विश्वस्त वल्लभ शेळके, एकनाथ शिंदे, अशोक सोनवणे, जयसिंग औटी, मोहन हाडवळे आदींनी उपोषणकर्त्यांना भेटी दिली.





