मंचर – आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये महामार्गाच्या कडेला अनाधिकृत होर्डिंग उभी असून वादळी वाऱ्यामुळे ती पडून अपघात होण्याची शक्यता वाढली. होर्डिंग पावसाळ्यातील वादळी वाऱ्यामुळे पडू शकतात. त्यामुळे प्रशासनाने अनाधिकृत उभे केलेले होर्डिंग काढावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मंचर-भीमाशंकर रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी होर्डिंग ऊभे आहेत. बारमाही पर्यटक व भाविक भीमाशंकर येथे जात असतात. त्यामुळे भीमाशंकर रस्त्याच्या कडेला अनेक होर्डिंग उभे आहेत. त्याचप्रमाणे पुणे-नाशिक हायवे लगतच्या आणि मंचर पारगाव रस्त्या लगत गावांमध्ये अनेक होल्डींग उभे आहेत. तसेच गावागावीतील अनेक लोकांचे वाढदिवसाचे व इतर जाहिरातीसाठी होर्डिंग उभे आहेत. शासनाने या होर्डिंगची माहिती घेऊन परवानगी घेऊन उभे आहेत का, याची तपासणी करून प्रशासनाने कारवाई करावी. अशी मागणी होत आहेत. वाढदिवसाचे तसेच अनेक व्यवसायाची जाहिरात या ठिकाणी करत असतात. त्यामुळे जागा मालकांना यातून चांगला स्वरूपाचा मोबदला मिळतो. त्यामुळे एकंदरीतच सर्व होर्डिंगची तपासणी करून कारवाई करावी.अशी मागणी होत आहे.