Pune district : वाघोलीतील दोघांची ट्रेडिंगमध्ये 20 लाखांची फसवणूक

वाघोली – ट्रेडिंगमध्ये नफ्याच्या बहाण्याने वाघोली येथील दोघांची ट्रेडिंगमध्ये नफ्याच्या बहाण्याने 20 लाख 61 हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले असून याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिल्या प्रकरणात वाघोलीतील लोहगाव रोड परिसरात राहणार्या 33 वर्षीय तरुणाला मेसेज करून व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये अॅड केले. ग्रुपवर शेअर मार्केटची माहिती देऊन तसेच वोट केल्यावर पॉईंट देण्याचे सांगून लिंकवर अकाउंट उघडण्यास सांगण्यात आले. ट्रेडिंगबाबत फायद्याचे बनावट स्क्रीनशॉट ग्रुपवर टाकण्यात आले.
पॉईंटचा थोडा फायदा मिळाल्याने तरुणाने विश्वास ठेवून वेळोवेळी 13 लाख 33 हजार रुपये रुपये गुंतवले. अकाउंट सुमारे 33 लाख रुपयांचा लाखांचा फायदा झाल्याचे दिसत असल्याने पैसे काढण्यासाठी प्रयत्न केला असता आणखी पैसे भरण्यास सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या प्रकरणात कमलबाग परिसरातील 37 वर्षीय व्यक्तीला मेसेज करून लिंकद्वारे अॅमेझोनवर प्रोडक्ट अॅड केल्यावर पैसे मिळण्याचे आमिष दाखविण्यात आले. व्यक्तीने टास्क केल्यावर 10 हजार रुपये देण्यात आले. विश्वास बसल्याने सायबर चोरट्यांनी व्यक्तीला ट्रेडिंग अकाउंट उघडायला सांगून गुंतवणूक करण्यास सांगितले.
विविध बँक खात्यात पैसे पाठवून 7 लाख 28 हजार रुपये व्यक्तीने गुंतवले. त्याचे 11 लाख 16 हजार रुपये झाल्याचे दिसत असताना पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला असता आणखी 4 लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





