पुणे जिल्हा : बारामती-मोरगाव रस्त्यावरील अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

मोरगाव : पुणे जिल्हा मार्ग क्र ६५ वरील बारामती मोरगाव रस्त्यावर तरडोली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अज्ञात वाहनाने मोटर सायकलला धडक दिली त्यामध्ये माळेगाव येथील दत्तात्रय दिनकर जाधव हे जागीच मृत पावले आहेत. तसेच तेथे आणखी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. त्याची ओळख अद्याप पटली नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोरगाव बारामती रस्त्यावरील तरडोली नजीक राखीव वनक्षेत्रालगत अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटार सायकल क्र एम.एच. ४२ ए. टी. ५९९१ दत्तात्रय दिनकर जाधव यांचा जागीच म्रुत्यु झाला आहे. या अपघात स्थळी आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.
वरील घटनेची माहिती समजताच सुपा पोलीस स्टेशन अंतर्गत मोरगाव पोलीस मदत केंद्राचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाघोले सह पोलीस कर्मचाऱ्यांनी घयनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पुढे पाठविण्यात आला पोलिसांच्या वतीने अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.





