पुणे जिल्हा : इंदापूर बाजार समितीच्या सभापतीपदी तुषार जाधव यांची निवड

उपसभापतीपदी मनोहर ढुके बिनविरोध
इंदापूर : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी तुषार जाधव यांची तर उपसभापती पदी मनोहर ढोके यांची बिनविरोध निवड गुरुवार दि.3 रोजी करण्यात आली.
इंदापूर बाजार समिती नुतन संचालक मंडळाची निवड दि. २९ एप्रिल २०२३ रोजी झाली. त्यावेळी ज्येष्ठ संचालक विलासराव माने यांची सभापती व रोहित मोहोळकर यांची उपसभापती म्हणुन निवड करण्यात आली होती. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन सभापती उपसभापती यांची निवड घेण्यात आली.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती व मार्गदर्शक जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, बाजार समितीने सभापती व उपसभापती यांनी सर्व संचालक मंडळ यांना विश्वासात घेऊन बाजार समितीचे मुख्य व उपबाजाराच्या ठिकाणी शेतकरीभिमुख आवश्यक अधुनिक सुविधा उभारणी करून बाजार समितीचा नावलौकिक वाढवला. शिवाय बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होऊन बाजार समितीची उलाढाल उच्चांकी रु. ३५० कोटीच्या पुढे गेली. सभापती व उपसभापती यांनी बाजार समितीच्या कामकाजात दुरदृष्टीचा विचार करून, पूर्ण वेळ देऊन शिस्तबद्ध कामकाज केले.
मोहोळचे आमदार यशवंत माने व बाजार समितीचे मार्गदर्शक आ अप्पासाहेब जगदाळे यांचे व नुतन सभापती व उपसभापती, मावळते सभापती व उपसभापती यांच्या कामकाजाचे कौतुक केले. तसेच सर्व संचालक मंडळ यांच्याशी विचार विनिमय करून वि.का. सोसायटी, ग्रामपंचायत, दूध संस्था, पतसंस्था व शैक्षणिक संस्थामध्ये आणि बाजार समितीचे संचालक म्हणून अतिशय अल्पावधीत शेतकऱ्यांशी नाळ जोडून सर्व सर्वसामान्यांच्या विकासाकरीता व हितासाठी कार्यरत असलेले उमदे युवा कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व तुषार जाधव यांची बाजार समितीच्या सभापती पदी निवडीची घोषणा केली. त्याची संचालक दत्तात्रय फडतरे यांनी सुचना मांडली व त्यास विलासराव माने यांनी अनुमोदन दिले. तसेच साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे ज्येष्ठ संचालक मनोहर ढुके यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन सहाय्यक निबंधक, एस. एस. कदम यांनी कामकाज पाहिले. निवडीनंतर आप्पासाहेब जगदाळे, आमदार यशवंतराव माने, अॅङ तेजसिंह पाटील, अंकुश जाधव, अॅङ राहुल मखरे, देवराज जाधव, कांतीलाल झगडे, सागर मिसाळ, मुंकुद शहा, विजय शिंदे, कालिदास देवकर, बापू जामदार, छायाताई पडळकर, चित्तरंजन पाटील, प्रतापराव पालवे, अमर जगदाळे, संतोष वाबळे, गणेशकुमार झगडे, अमोल भोईटे तसेच बाजार समितीचे संचालक विलासराव माने, रोहीत मोहोळकर, दत्तात्रय फडतरे, मधुकर भरणे, संग्रामसिंह निंबाळकर, संदिप पाटील रुपाली संतोष वाबळे, आबा देवकाते, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे, प्रभारी सचिव संतोष देवकर व विविध संस्थाचे पदाधिकारी, शेतकरी, आडते-व्यापारी, हमाल-मापाडी उपस्थित होते.
सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने बाजार समितीचे माध्यमातून शेतकरी, व्यापारी, हमाल-मापाडी व कामगार यांचा समन्वय साधुन बाजार समितीचे कामकाज अतिशय जोमाने विकासात्मक भूमिका घेऊन सदैव कार्यरत राहू असे नुतन सभापती तुषार जाधव व उपसभापती मनोहर ढुके यांनी सांगितले.





