Pune District : पारवडीत कृषीकन्यांकडून वृक्षसंवर्धाचा जागर

माळेगाव – ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पारवडी येथे शेतकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, बारामती अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे) कार्यक्रमांतर्गत चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींनी शेतकरी प्रशिक्षण शिबिरात विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार केला. यावेळी रोपण करून वृक्षसंवर्धानचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थिनींना प्रत्यक्ष शेतकऱ्याचा अनुभवातून शिक्षण देणे आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे असा आहे. पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत कांचन सागर, गीतांजली लडकत, हेमाली बोडरे ,वैष्णवी गायकवाड, स्वरूपा पाटील ,ऋतुजा मराडे ,अक्षदा रोकडे, ऋतुजा माने या विद्यार्थिनी गावात विविध कृषी विषयक उपक्रम राबवणार आहेत कार्यक्रमांतर्गत महत्त्वाचे उपक्रम राबविले जाणार आहेत.
शेतकरी प्रशिक्षण शिबिरे, पिक पद्धती, खत व्यवस्थापन, किड व रोग नियंत्रण, नवीन तंत्रज्ञान प्रचार, मृदा परीक्षण व आरोग्य कार्ड, पशुधन व्यवस्थापन, शेतीपूरक व्यवसाय प्रोत्साहन, शालेय कृषी जागृती या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामस्थ व सर्व शिक्षक स्टाफ देखील उपस्थित होता.





