माऊली, तुकोबांच्या पालखी सोहळा आगमनामुळे अनेक रस्ते बंद आळंदी – पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळा पूर्ण करून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या रविवारी (दि. 20) आळंदीत दाखल होणार आहेत. अनेक वर्षांनंतर दोन्ही संतांच्या पालख्या एकाच दिवशी आळंदीत येत असल्याने या संतभेट सोहळ्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामुळे आळंदी परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत विशेष बदल जाहीर केले आहेत. पोलिस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी रविवारी दुपारी 2 ते रात्री 8 वाजेपर्यंत आळंदीतील प्रमुख मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या वाहनांना, विशेषतः जड-अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने, पोलीस वाहने आणि दिंडीतील वाहने यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. वाहतूक बंदी पर्यायी मार्ग पुणे मार्गे आळंदी (अलंकापुरम चौक/चर्होली फाटा) सर्व वाहनांना बंदी अलंकापुरम चौक-जयगणेश साम्राज्य-मोशी-चाकण मोशी मार्गे आळंदी (डुडुळगाव जकात नाका) सर्व वाहनांना मनाई डुडुळगाव जकात नाका-केळगांव बायपास मरकळ चौक मार्गे नगरपरिषद चौक : सर्व वाहनांना बंदी चाळीस फुटी रस्ता-वडगांव रोड-पीसीएस चौक चाकण मार्गे आळंदी (जोग महाराज धर्मशाळा) सर्व वाहनांना मनाई चर्होली फाटा-धानोरे फाटा-मरकळ जड-अवजड वाहनांसाठी : चाकण-आळंदी फाटा, चिवळी फाटा आणि जयगणेश साम्राज्य चौक-मोशी मार्गे अलंकापुरम चौक येथे प्रवेशबंदी. पर्यायी मार्ग: आळंदी फाटा, चिंबळी फाटा आणि जयगणेश साम्राज्य चौक-मोशी मार्गे इच्छित स्थळी.