पुणे जिल्हा : विद्या निकेतनमधील चौघी राष्ट्रीय संघात

थ्रो बॉल स्पर्धेसाठी निवड : लाखेवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा
इंदापूर : जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीच्या तीन विद्यार्थिनींची थ्रो बॉल स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.
बिजनोर महोत्सव विवेक युनिवर्सिटी, बिजनोर- उत्तर प्रदेश येथे नुकत्याच पार पडलेल्या 45 व्या राष्ट्रीय थ्रो बॉल चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेमध्ये विद्यानिकेतनमधील प्रतिक्षा बाबर, मोनल पांडुळे, अश्विनी कासवेद, क्रांती मारकड या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय थ्रो बॉलसंघात निवड झाली आहे.
या विद्यार्थिनी पुढील काळात नॅशनल थ्रो बॉल वुमेन्स संघाकडून खेळणार आहे. थ्रो बॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांचेकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार प्रदीप गुरव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सम्राट खेडकर यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे, क्रीडा शिक्षक तलवारे आणि संघ व्यवस्थापक बोरकर यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





