पुणे जिल्हा : श्रीक्षेत्र आळे रेडा समाधीचे हजारो भाविक भक्तांनी घेतले दर्शन

आळेफाटा : कार्तिकी एकादशीनिमित्ताने मंगळवारी श्रीक्षेत्र आळे येथील वेद बोलवलेल्या रेडा समाधी मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले व भाविकांनीही येथे सकाळपासून दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
आळे (ता. जुन्नर) येथील श्रीश्रेत्र रेडा समाधी या ठिकाणी कार्तिकी एकादशी निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पहाटे माऊलींचा महाअभिषेक एकादशी व बारशीचे असलेले अन्नदाते कै. रविंद्र सदाशिव कु-हाडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने तसेच कै. मेहरबान लक्ष्मणराव कोंडाजी डोके यांच्या स्मरणार्थ पंचायत समितीचे माजी सदस्य नेताजी डोके, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या नयना डोके, प्रसन्न डोके, राजेंद्र डोके, रविंद्र डोके, अमीत डोके, रामचंद्र गाडेकर यांचे कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आली.
याप्रसंगी ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष होनाजी गुंजाळ, उपाध्यक्ष अमोल भुजबळ, सेक्रेटरी सुनिल जाधव, खजिनदार विलास शिरतर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व देवस्थान ट्रस्टचे विद्यमान संचालक प्रसन्न डोके, पंचायत समितीचे माजी सदस्य जीवन शिंदे, व्यवस्थापक कान्हू कु-हाडे, सप्ताह कमिटी अध्यक्ष संजय कु-हाडे, निलेश पिंगळे, अविनाश कु-हाडे, संतोष कु-हाडे, पांडुरंग डावखर, संजय गाढवे, गणेश शेळके, संदिप पाडेकर, ज्ञानेश्वर गाढवे,
दिनकर राहिंज, संतोष डावखर गणेश गुंजाळ, चारूदास साबळे आदी मान्यवर, ग्रामस्थ वारकरी उपस्थित होते. सायंकाळी ह. भ. प. रावजी महाराज सहाने यांचे हरि किर्तन झाले. दिवसभरात तालुक्याच्या विविध गावांमधील दिंड्या या ठिकाणी आल्या होत्या. यावेळी आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करत होते.





