पुणे जिल्हा : रस्त्यावर कचरा टाकणा-यांनो सावधान

आळेखिंडीत कचरा टाकल्यास कडक कारवाई
आळेफाटा – पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर आळेखिंडीत जे नागरीक कचरा टाकत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रातांधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आळेखिंड येथे संतवाडी (ता.जुन्नर) गावाच्या रस्त्याच्याकडेला बेजवाबदार नागरिक मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशव्यासह घनकचरा टाकत असल्याने दुर्गंधी पसरल्याने. त्याचा परिणाम म्हणून महामार्गावर सर्वत्र दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य आणि आरोग्याचा धोका या ठिकाणाहून जात असलेल्या प्रवासी तसेच स्थानिक नागरीकांना होत असल्याने संतवाडी गावातील ग्रामस्थ तसेच काळजी झाड फाउंडेनशनचे पदाथिकारी यांच्या वतीने आळेफाटा येथील चौकात स्वातंत्र्य दिनी उपोषणास बसले होते.
या उपोषणाची दखल तहसीलदार शेळके यांनी घेत घटना स्थळीभेट दिल्यानंतर आठच दिवसांमध्ये प्रांताधिकारी यांच्याशी ग्रामस्थांसमवेत बैठक घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते, त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, आश्वसनानुुसार प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी तहसीलकार्यात संतवाडी, आळे, वडगाव आनंद येथील ग्रामस्थांसमवेत आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते.
बैठकीमधील निर्णय :
* तीनही ग्रामपंचायत/ग्रामसेवक यांनी असे कृत्य करणा-या व्यवसायीक आस्थापना/ संस्था/ व्यक्ती यां नोटीस देऊन आवशयक कार्यवाही करावी.
* संबधीत ग्रामपंचायतींनी हॉटेल व्यवसायीक यांना त्यांचेकडील कचरा तेथील परिसरात टाकू नये याबाबत लेखी नोटीस / सूचना द्या
संबंधीत ग्रामपंचायत यांनी कचरा डेपो करीता जागा निश्चित करुन जागा मागणी प्रस्ताव गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचेमार्फत या कार्यालयास सादर करावा.
* परिसरात टाकणेत येणार्या जैव वैद्यकीय कच-यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असलेने तालुका आरोग्य अधिका-यांनी परिसरातील वैद्यकीय आस्थापणा यांची तपासणी करण्यात यावी





