पुणे जिल्हा : हे राजकारण विकासाचं, दमदाटीचे नाही ; खासदार निलेश लंके

दौंडमध्ये मविआची प्रचार सभा
राहू/यवत – पोलिस प्रशासनाने दबावाला बळी पडू नये. हे राजकारण विकासाचं आहे दमदाटीच नाही, असा निर्वाणीचा इशारा खासदार निलेश लंके यांनी दौंडच्या सत्ताधारी आमदारांना दिला आहे. दौंड तालुक्यात (दि.१५) महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या जाहीर सभेचे आयोजन दौंड शहरात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, आम्ही रमेश थोरात यांच्यामुळे आमदार व खासदार झालो आहे. आमच्या मतदारसंघात देखील दौंड सारखाच अहंकार होता. तो आम्ही मोडून काढला आहे, असाच अहंकार देखील येथे मिळणार आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आमचे संसदेतले सहकारी डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली.
त्यावर लंके यांनी महायुतीचा खरपूस समाचार घेतला. लंके म्हणाले की, आपण बोलत असताना आपण काय करतो, हे पाहावे. आपला भीमा पाटस कारखाना काय परिस्थितीत आहे, हे पाहावे. अहो आम्ही 25 लाख लोकांमधून निवडून येतो. आम्ही उपरे कसे, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
यावेळी रमेश थोरात यांनी देखील अमोल कोल्हे यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीची जाहीर निषेध व्यक्त केला. काहींचा असा समज असतो की, हे राज्य आम्ही चालवतो. परंतु त्यांना माहीत नाही की, हे राज्य जनता चालवते. त्यामुळे कोणीही जास्त अहंकारात राहू नये.
ते म्हणाले की, जातीयवाद वाढवायचे काम भाजपाने केले आहे.
आपण सर्व एकच आहोत. त्यामुळे आपल्याला महविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे. त्यादृष्टीने काम करायचे असून त्यातील एक घटक म्हणून रमेश थोरात यांना विधानसभेत पाठवायचे आहे. यावेळी व्यासपीठावरील अनेक मान्यवरांनी भाषणे केली.





