लोणी काळभोर : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिरोज शेख याच्या टोळीवर लोणी काळभोर पोलिीसांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली असून मागील चार महिन्यांच्या कालावधीत ही तिसरी कारवाई आहे. या संदर्भात सविस्तर माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली. प्रसाद दत्तात्रय जेठीथोर (वय 20, रा. लोणी काळभोर), फिरोज महंमद शेख (वय 29), अस्लम अन्वर शेख (वय 25), आदित्य प्रल्हाद काळाणे (तिघे रा. कदमवाकवस्ती) व एक विधीसंघर्षित बालक अशा पाच जणांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 13 एप्रिल रोजी कदमवाकवस्ती येथे विनोद झेंडे यांच्या घरासमोर जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिरोज शेख व त्याच्या साथीदारांनी हातात लाकडी दांडेके घेऊन आज खल्लासच करुन टाकू, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या घराच्या दरवाजावर लोखंडी कायत्याने तसेच लाकडी दांडक्याने मारले. रिक्षावर लोखंडी कोयते मारुन पुढील बाजुची काच फोडली. पान दुकानाच्या शटरवर लोखंडी कोयत्याने मारुन पान दुकानाचे नुकसान केले. तसेच तेथे जमलेल्या लोकांच्या दिशेने धावून गेल्याने लोक सैरावरा पळून गेले. त्यानंतर ते सर्वजण लाल रंगाच्या कारमध्ये बसुन त्या ठिकाणाहुन निघून गेले. या संदर्भात पाच जणांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, दहशत करणे, घातक शस्त्राचा वापर करुन मारहाण करुन गंभीर जखमी करणे, बेकायदेशीररीत्या हत्यार जवळ बाळगणे, दहशत पसरविणे इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस उपायुक्त यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त यांना प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार अपर पोलीस आयुक्तांनी