पुणे जिल्हा : दुटप्पी भूमिका घेऊन राजकारणात कधी यश येतं नसत

विरोधी उमेदवाराला संस्थांची रचना याचे ज्ञान नाही – भाजप जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टेपाटील
चिंबळी – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील विरोधी उमेदवार वारकरी असल्याचे ढोंग करुण दुट्टपी भूमिका घेत आहे. एका बाजूला सांगायचे मी वारकरी आहे. आणि दुसर्या बाजूला संत ज्ञानेश्वर महाराज व इतर संत तसेच वारकरी सांप्रदाय, वारकरी यांच्यावर टीका करून त्यांचा अपमान करणार्या सुषमा अंधारे यांची खेड तालुक्यात सभा घेतलीच कशी? पक्षाच्या नेत्यांना सांगून सभा रद्द का केली नाही. दुटप्पी भूमिका घेऊन राजकारणात कधी यश येतं नसत अशी खरमरीत टीका पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष शरद बुट्टेपाटील यांनी विरोधी उमेदवारावर करीत त्यांचा वारकरी असल्याचा बुरखा फाडला.
मरकळ (ता. खेड) येथे खेड-आळंदी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आयोजित प्रचारसभेत बुट्टेपाटील बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील, राम गावडे, कैलास सांडभोर, शांताराम भोसले,राजाराम लोखंडे, दिलीप नाईकनवरे, शांताराम सोनवणे, बाळासाहेब कोळेकर, नवनाथ होले, जयसिंग भोगाडे, शरद मु-हे, कल्पना गवारी, तुकाराम वहिले, प्रकाश वाडेकर, धनंजय पठारे, विशाल पोतले, बापूसाहेब थिटे, विमल ठाकूर, कमल कड, संग्राम सांडभोर, निलेश थिगळे, विकास भिवरे, आनंद गवारे आदी मान्यवर तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद बुट्टे पाटील म्हणाले की, सोसायटी, मार्केट, बँक सगळीच पदे यांना पाहिजे अशी टीका ते करतात. पण बाजार समितीची निवडणूक लढवायची असेल तर पहिले सोसायटीवर निवडून यावे लागते. आण्णा सोसायटीचे संचालक झाले बाजार समितीवर निवडूण आले. राज्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष झाले. त्यांच्या रूपाने राज्याच्या बाजार समितीचे अध्यक्षपद तालुक्याला मिळाले.अध्यक्ष झाल्यावर त्यांनी शेतकर्यांचे अनेक प्रश्न सोडवले. पीडीसीसी बँकेवर संचालक होण्यासाठी सोसायटीचे प्रतिनिधि असावे लागते आणि मग बँकेवर निवडून येता येते. आण्णा बँकेवर संचालक झाल्यावर तालुक्यातील शेतकर्यांना जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध झाले पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तालुक्यातील बँकेच्या शाखांचे नूतनीकरण केले. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, अशोक पवार, रमेश थोरात हे सगळे नेते पी. डी. सी. सी. बँकेवर काम करत आहेत. तुम्हाला जर या संस्थांचे ज्ञान नसेल, रचना माहीत नसेल तर तुम्ही आरोप कशाच्या धर्तीवर करता..! केवळ लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम सुरु आहे.
…मग मोठी कामे मंजूर होतात
कुठल्याही प्रकारची विकासकामे करतांना त्याचे ज्ञान असावे लागते. छोटीमोठी कामे तर सगळेच करतात. पण गेल्या अनेक वर्षांपासून न झालेली विकासकामे करण्याचा प्रयत्न आण्णांनी केला. विकासकामे करतांना प्रशासनावर वचक लागतो, नेता पाठीमागे लागतो या सगळ्या गोष्टी आण्णा यांच्याकडे आहे. अजित पवार यांच्यासारखा नेता त्यांच्या पाठीमागे उभा आहे. पत्र गेले शिफारस केली म्हणजे काम मंजूर झाले असे कधी होत नाही. त्या खात्याच्या मंत्र्याची मंजुरी लागते. मंत्रिमंडळ बैठकीत हे सगळे निर्णय होत असतात आणि मग मोठी कामे मंजूर होत असतात. विरोधकांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर केलेल्या प्रत्येक टीकेला प्रतिउत्तर बुट्टेपाटील यांनी दिले.





