पुणे जिल्हा : आदिवासी समाजाची नाळ महायुतीसोबत जोडलेली

नरहरी झिरवळ : आमदार बेनकेंच्या प्रचारार्थ जुन्नर येथे सभा
जुन्नर – जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार अतुल बेनके सदैव आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी पाठीशी उभे राहिले असून त्यांनी आदिवासींचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहे,. तसेच महायुती सरकार आणि आदिवासी समाजाची नाळ जोडलेली असून ती कधीही तुटू देणार नाही, ग्वाही विधानसभेचे उपसभाती नरहरी झिरवळ यांनी दिली.
आमदार अतुल बेनके यांच्या प्रचारार्थ जुन्नर येथे आयोजित सभेत झिरवळ बोलत होते. ते म्हणाले की, विधानसभेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर आदिवासी समाजाच्या 193 बैठका घेतल्यात त्या प्रत्येक बैठकीला कुठलेही कारण न सांगता आमदार बेनके उपस्थित होते. आपल्या राज्यात एकूण 0 ते 20 टक्के मतदान संख्या असलेले 72 मतदार संघ आहे. त्यामध्ये 25 आदिवासी आमदार आहेत. परंतु आदिवासी समाजाच्या हिताच्या दृष्टीने अतुल बेनके आणि सुनील शेळके यांनी नेहमीच कणखर भूमिका घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले.
अजित पवार फणसा सारखे असून सर्वांना सांभाळून घेणारा माणूस आहे. आम्ही एवढे दिवस झाले परंतु त्यांच्याजवळ गेलो नाही. परंतु अतुल बेनके आमच्याही पुढे गेले आहेत. आदिवासींच्या संदर्भात कुठलाही निर्णय घेताना महायुतीच्या सरकारमध्ये आम्हाला विचारले जाते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आदिवासी विभागाने ठक्कर बाप्पा योजना लागू केली त्या दिवसापासून आजपर्यंत 31 लाख 35 हजार रुपये शेवटचा मापदंड होता; परंतु आम्ही अजित पवारांना सांगून निधीत वाढ केली, असे झिरवळ यांनी नमूद केले.
बेनके छत्रपतींचे पहिले मावळे
आदिवासी समाजाला योग्य वाळणार नेले तर तो चांगला विकास करू शकतो. अतुल बेनके आदिवासी आहे असे सांगणारे छत्रपतींचे पहिले मावळे आहेत. त्यामुळे आदिवासी समाज तुमच्याबरोबर असून तुम्ही चिंता करू नका असे झिरवळ यांनी म्हटले. धनगर आरक्षणावर आदिवासींना पाठिंबा देणारा अतुल बेनके पहिला आमदार आहे. मला मंत्री बनवण्यासाठी अतुल बेनके यांच्या सारख्या आमदारांची आवश्यकता आहे. ते माझ्या बरोबर नसले आणि मी निवडून आलो तर मी कसा मंत्री होणार असा प्रश्न झिरवळांनी विचारला.
त्यानंतर उर्वरित चार हजार कोटी मिळाले
आजपर्यंत 53 वेळा आदिवासी विभागाचे बजेट झाले त्यामध्ये फक्त तीन वेळा प्लस आहे. तर 50 वेळा मायनस आहे. त्यावेळी वित्तमंत्री फडणवीस यांनी मागील दोन वर्षाचे पैसे देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर अजित पवार वित्तमंत्री झाल्यानंतर उर्वरित 4 हजार कोटी दिले, असे झिरवळ यांनी नमूद केले.





