पुणे जिल्हा : गणेशमूर्तींवर फिरतोय अखेरचा हात
Updated On:

आळंदी : येथून जवळच असलेली चर्होली बुद्रुक येथे गेली अनेक वर्षांपासून विविध आकारातील गणेश मूर्ती बनविण्याचे काम संपूर्ण कुंभार परिवार करीत आहे,
गणेश उत्सव तोंडावर येऊन ठेपला असून, गणपती बाप्पांच्या मूर्तींवर अखेरचा हात फिरविताना योगेश कुंभार व कुंभार परिवाराची लगबग सुरू आहे. यंदा मूर्तीच्या विक्रीमध्ये सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे हा निर्णय कुंभार परिवाराने घेतल्याचे सांगण्यात आले. हजारो मूर्तींचे एक महिन्यापूर्वीच बुकिंग झाले आहे. आता मर्यादित मूर्तीं शिल्लक राहिले असून त्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत असे कुंभार परिवाराकडून सांगण्यात आले.





