पुणे जिल्हा : आंबेगाव तालुका पूर्व भागात कार्यकर्त्यांचा जल्लोष

लोणीधामणी – आंबेगाव पूर्व भागातील शिरदाळे, रानमळा व पोंदेवाडी या तीन गावांनी वळसे पाटील यांना मताधिक्य दिले आहे. त्यांच्या विजयानिमित्त शिरदाळे येथे राष्टवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार घोषणा देऊन जल्लोष व्यक्त केला.
तालुक्यातील पूर्वेकडील शिरडाळे, रानमळा, पोंदेवाडी गावाने दिलीप वळसे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची इतिहास कायम ठेवला आहे. या गावामध्ये झालेली विकासकामे तसेच गावातील युवकांचे संघटन यामुळे हे शक्य झाले आहे. गावात प्रमुख म्हणून काम करणाऱ्यांची असणारी एकजूट आणि तरुणवर्ग यामुळे गावकरी त्यांच्यावर विश्वास टाकत असल्याचे ग्रामस्थानी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी तालुका युवक उपाध्यक्ष मयुर सरडे, माजी सरपंच मनोज तांबे,तालुका सरचिटणीस गणेश तांबे,विद्यमान उपसरपंच बिपीन चौधरी ,माजी सरपंच राजेंद्र चौधरी,वसंत तांबे, निवृत्ती तांबे,सोसायटी संचालक जयदीप चौधरी,राघू रणपिसे, माजीं चेअरमन कांताराम तांबे, कोंडीभाऊ तांबे, अनिकेत चौधरी, सिद्धार्थ तांबे, बाळासाहेब रणपिसे, तान्हाजी महाराज तांबे, केरभाऊ तांबे, कल्पेश सरडे, शुभम तांबे, संतोष तांबे, शंकर तांबे, सुरेश तांबे, बबन तांबे, मारुती तांबे, सोमनाथ तांबे, मच्छिन्द्र चौधरी, शिवाजी सरडे, विक्रम तांबे, तात्याभाऊ चौधरी आणि ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.





