विरोधकांकडून प्रतिसभा : आमदार अशोक पवारांच्या कारभारावर टीकास्त्र मांडवगण फराटा – न्हावरा (ता. शिरूर) येथे घोडगंगा सहकारी साखर कारखाना गळीत हंगामाची ३३ वी सर्व साधारण सभा दुपारी २ वाजता कारखान्याच्या प्रांगणात आयोजित केली होती. मागील सभेचे इतिवृत्तांत वाचताना सुधीर फराटे यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांना कारखाना संदर्भात अनेक सभासदांनी प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना उत्तरे देत असताना सभासदांचे समाधान झाले नाही. सुरवातीला सभेत सभासदांनी प्रचंड आक्रोश करीत गोंधळ घातला. सभा शांततेत व्हावी म्हणून अनेकदा आमदार अशोक पवार यांनी आवाहन केले. सभासदांनी वेगवेगळ्या घोषणा देत सभा निम्यातच बंद पाडली. सत्ताधारी यांनी गोंधळातच सभा गुंडाळली. सभासदांची दुसऱ्या बाजूला लगेच प्रतिसभा सुरू झाली. या सभेला ८० ते ८५ टक्के सभासदांचा सहभाग दिसून आला. या प्रतिसभेत दादा पाटील फराटे म्हणाले की, या कारखाण्यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. दहा वर्षांपूर्वी (स्व) बाबुराव पाचर्णे व आम्ही सांगितले होते, एक दिवस हा कारखाना अशोक पवार बंद पडतील. ते आज खरे झाले आहे. दुःख याचे आहे की, सभासदांचे, कामगारांचे प्रपंच उघड्यावर आले आणि सभासद असणारे काही जण कारखाना बंद पडणाराचा जयजयकार करतात. मागील २ वर्षापासून घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असून आर्थिक संकटात सापडला आहे. व्यंकटेश कारखाना मात्र राज्यात आर्थिक नियोजनात सर्वोच्च बक्षीस मिळवतो. सुधीर फराटे यांनी आकडेवारी सांगत सद्यपरस्थिती सभासदांना सांगितली. रवी काळे यांनी सांगितले की, शरद पवार हे सर्वांचे आदरणीय आहेत. त्यांच्याच विरोधात अशोक पवार यांनी अनेकवेळा काम केले असून आज निष्ठावान असल्याचे सांगत आहेत. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिसभेला दादा पाटील फराटे, चंदन सोंडेकर, रवी काळे, सुधीर फराटे, महेश ढमढेरे, राहुल पाचर्णे, राजेंद्र कोरेकर, सभासद उपस्थित होते. —–