Pune district : श्रीनाथांच्या भक्त भेटीचा उत्सव रंगला

श्रीक्षेत्र वीरमध्ये काठ्या ढोल नगाराने परिसर दुमदुमला
परिंचे – श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमीचे औचित्य साधून श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व आई जोगेश्वरी यांच्या मूर्तींना रिठ्याच्या पानाचे अलंकार घालीत पूजा करण्यात आली. देवाची पालखी व वस्त्र परिधान केलेल्या मानाच्या काठ्यांसह सर्व भाविक भक्त, दागीनदार, ग्रामस्थ यांच्या लवाजम्यासह श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची पालखी भक्त कमळाजी भेटीला माळावर गेली. श्रीनाथांची पालखी काठ्या ढोल नगाराच्या आवाजात भक्त कमळाची मंदिर येथे भेटा-भेट झाली. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
दुपारी १२ वाजता धुपारती होऊन फुलांनी सजलेल्या पालखीत श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचे उत्सव मूर्ती पालखीत ठेवून पालखीची छबिण्यासह एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी भक्त भेटीसाठी कमळाजी मंदिर माळावर गेली होती. देऊळवाड्यातून पालखी बाहेर जातन पालखीवर पुष्पवृष्टी केली. यावेळी वस्त्र परिधान केलेल्या मानाच्या काठ्याच्या फुलासह, रंगीबेरंगी, फुगे, बांधून सजावट केलेल्या काठ्या, पालखी पुढे उपस्थित होत्या. गुलालाची उधळण करत ढोल ताशाच्या गजरात देवाचा छबिना भरला होता
नवरात्र उत्सव ८ वी माळ महाष्टमी उपवासनिमित्त श्रीनाथ मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली होती. सजावटकार श्रीनाथ फ्लॉवर डेकोरेटर्स वीर शुभम कुदळे, विश्वस्त मंडळामार्फत भाविकांना सुविधा दिल्या. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई (योगदान नाना वाघ कैलास औसक व बडदे) केली होती. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ उपाध्यक्ष अमोल आ. धुमाळ, सचिव काशिनाथ धुमाळ, विश्वस्त सुनील धुमाळ, विराज मोहनराव धुमाळ, अमोल धोंडीबा धुमाळ, बाळासाहेब समगीर, श्रीकांत थिटे, प्रमिला देशमुख, जयवंत सोनवणे उपस्थित होत
रीठ्याच्या पानाची अलंकार पूजा
श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर हे परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडवत आहे. मंगळवार (दि.३०) पहाटे पूजा होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद केला. सकाळी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुला केला. श्रीनाथ व आई जोगेश्वरी यांना रीठ्याच्या पानाची अलंकार पूजा घातल्यामुळे श्रीनाथांचे रूप उजळले होते. फुलामाळी यांनी रिठ्याच्या पानाची व्यवस्था केली होती. सोनार दिक्षित परिवार, गुरव मंडळींनी अलंकार सजवला. सायंकाळी नेताजीआबा धुमाळ (वाडकर) यांचेमार्फत मानाचा साडी वाटपाचा कार्यक्रम होतो. अनेक रिवाज हे पूर्वापार चालत आले असून पुढेही चालवले जात आहेत.





