Pune District : दौंडमध्ये इच्छुकांची मशागत वाया

तालुक्यातील स्थिती : काहींना फायदा
त्रिभूज शेळके
पारगाव – दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद गटाची संख्या ६ होती. पंचायत गण १२ होते. आता गट पुनर्रचनेत एक गटाने वाढ होऊन ७ गट व १४ गण झाले आहेत. त्यामुळे सर्वच गट- गणातील गावांची अदलाबादल झाली असल्याने अनेक जणांची निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन केलेली राजकीय मशागत वाया गेली आहे. काही जणांना छप्पर फाड के फायदा झाल्याने इच्छुक उमेदवार सुखावले आहेत.
दौंड तालुक्यात गेल्या झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ६ गट आणि १२ गट होते. यावेळी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. त्यात राजकीय शिवार तापू लागले. पारूप आराखडा तयार झाल्यानंतर यात एक गट आणि दोन गणांची भर पडली आहे. त्यामुळे इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. जाहीर केलेल्या प्रारुप आराखड्यात नवीन पुनर्रचनेत गावांची अदलाबदला झाल्याने राजकीय समीकरणे एका झटक्यात बदलून जाणार आहेत.
दौंड तालुका गट व गण व गणातील गावे पुढीलप्रमाणे-
राहू- खामगाव गट
राहू गण- राहू, पिलानवाडी वाळकी, कोरेगाव भिवर, वडगाव बांडे, टेळेवाडी, पानवली.
खामगाव गण – पाटेठाण, देवकरवाडी, खामगाव, तांबेवाडी, दहिटणे, मिरवडी, एकेरीवाडी, उंडवडी, नाथाचीवाडी, टाकळी, लडकतवाडी.
पारगाव- वरवंड गट
पारगाव गण- पिंपळगाव, देलवडी, गलांडवाडी, पारगाव, खोपोडी, दापोडी.
वरवंड गण – वरवंड, नानगांव,गणेश रोड, अमोणिमाळ, कडेठाण, हातवळण
गिरिम- गोपाळवाडी गट
गिरीम गण – कानगाव, गार, नवीन गार, बेटवाडी, गिरीम, सोनवडी, नानवीज.
गोपाळवाडी गण – गोपाळवाडी, दौंड ग्रामीण, लिंगाळी, माळवाडी, मेरगळवाडी, मसनेरवाडी.
देऊळगाव राजे – खडकी गट
देऊळगाव राजे गण – खोरवडी, आलेगाव, कदम वस्ती, देऊळगाव राजे, पेडगाव, वडगाव दरेकर, बोरीबेल, गाडेवाडी, हिंगणी बेर्डी, काळेवाडी, शिरापूर, लोणारवाडी.
खडकी गण – मलठण, गावडे, बगाडे वस्ती, वाटलूज, नायगाव, खडकी, राजेगाव, खानोटा, स्वामी चिंचोली.
कुरकुंभ- पाटस गट
कुरकुंभ गण :- रावणगाव, नंदादेवी, कुरकुंभ, पांढरेवाडी, मळद, कौठडी, जिरेगाव, बिरोबा वाडी.
पाटस गण – रोटी, कुसेगाव, वासुंदे, हिंगणी गाडा, पाटस.
बोरीपार्धी- केडगाव गट
बोरीपार्धी गण – वाखारी, बोरीपार्धी, पडवी, देऊळगाव गाडा.
केडगाव गण – केडगाव, धुमळीचा मळा, निंबाळकर वस्ती, केडगाव स्टेशन, देशमुख मळा, हंडाळवाडी, भांडगाव, खोर, पिंपळाची वाडी.
यवत- कासुर्डी गट
यवत गण :- यवत, यवत स्टेशन, खुटबाव.
कासुर्डी गण- सहजपूर, बोरी भडक, बोरीऐंदी, ताम्हणवाडी, डाळिंब, कासुर्डी, कामटवाडी, जाऊजी बुवाची वाडी, भरतगाव, नांदूर, बोराटेवाडी.





