पुणे जिल्हा : बेल्ह्यातील रस्तावर चेंबर खचले ; अपघाताची शक्यता
Updated On:

बेल्हे – जुन्नर तालुक्यात बेल्हे गावातील यशवंतराव चव्हाण पतपेढी समोरील आता नवीन झालेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावरील चेंबर खचले आहे. चेंबर रस्त्याच्या मधोमध असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी मोठी नागरिकांची वर्दळ असते तसेच दिवाळीनिमित्त बाजार खरेदी करण्यासाठी जवळ मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे स्थानिकांची या रस्त्यावर वर्दळ असते. हा चेंबर रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी लहान मुले ही खेळत असतात त्यांनाही धोका आहे. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने त्या चेंबरची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
अपघात होण्याआधी प्रशासन जागे होतंय का याकडे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन तातडीने या चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत.





