पुणे जिल्हा : जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा सोहळा उत्साहात

दोन दिवस भरगच्च कार्यक्रम : २५ हजार भक्त सहभागी
रांजणगाव गणपती – जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पूर्वनियोजित समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रम मंगळवार व बुधवार दि. २ व ३ एप्रिल रोजी रांजणगाव गणपती येथे भव्य दिव्य उत्साहामध्ये पार पडला. कार्यक्रमाला जिल्ह्यातून दोन्ही दिवस २५ हजार भाविक भक्तगण उपस्थित होते.
(दि.२) सकाळी १० वाजता जगद्गुरू श्रींचे आगमन झाले. ढोल- ताशा व भजनाच्या गजरात स्वागत करण्यात आले. संतपिठावर माऊलींचे आगमन झाल्यानंतर पाद्यपूजन करण्यात आले. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे प्रवचन झाले. यानंतर समस्या मार्गदर्शन व दर्शन व ६०९ भक्तगणांनी उपासक दीक्षा घेतली. असा दिवसभर कार्यक्रम होता.
दुसऱ्या दिवशी जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे आगमन झाले. पाद्यपूजन करून लगेच प्रवचन व समस्या मार्गदर्शन व दर्शन व १८० भक्तगणांनी साधक दीक्षा घेतली. सायंकाळी माऊलींचा गजर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी भक्तगणांना महाप्रसादाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे आयोजक व मान्यवरांचे आभार मुख्य पीठ नाणिजधाम क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र पीठ समिती यांनी केले. दरम्यान, लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट देऊन स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे दर्शन घेतले. याप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





