पुणे जिल्हा : गुलालाची उधळण ना ढोल-ताशांचा कडकडाट

सासवड शहरात साधेपणाने गणरायाचे आगमन
सासवड – सासवड शहरांमध्ये गणेश मंडळे मोठ्या मूर्ती, आरास, देखावे यावर भर देत आहेत. गणेशोत्सव म्हटलं म्हणजे ढोल, ताशा, फटाके, कर्णकर्कश डी. जे चा आवाज, विविध कलागुण प्रात्यक्षिके दाखवणारी पथके, झांज पथकांच्या संगीत तालिमी, कसरतीचे खेळ दाखवणारे युवक, गणपती बाप्पा म्हटले की, आपोआपच मुखातून येणारे शब्द मोरया….. एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार……. वाद्या विना गणेश उत्सव बहुतेक दुसर्या वर्षीही सासवड शहरात साजरा होत आहे. असे असले तरी गणेशभक्तांचा उत्साह दांडगा असल्याचे दिसून आले.
श्री गणेश स्थापना करण्यासाठी तसेच मुहूर्त वेळ साधण्यासाठी सासवड येथील बाजार पेठेत सकाळ पासूनच भाविकांची काही तुरळक प्रमाणात गर्दी होती. गणेश मूर्ती स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारातील आणि आकारातील मूर्ती खरेदी करण्या साठी सर्वांचीच लगभग सुरु होती. त्या बरोबरच सजावटीचे साहित्य खरेदी करणे, विविध प्रकारची विद्युत रोषणाई, आरास करण्यासाठी विविध प्रकारची फळे, फुले, हार त्या बरोबरच पूजेचे साहित्य यामध्ये अगरबत्ती, धूप, कापूर, मध, अत्तर, गुलाबपाणी आदी साहित्य खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांची धावपळ सुरु होती.
सासवड शहरात अंदाजे जवळपास पंधरा ते वीस लाखांची उलाढाल झाली असल्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली. वाद्यविनाच अनेक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर वाहनांवर श्रींचा जयघोष करत आपल्या ठिकाणी प्रतिष्ठापना केली. पावसाची रिमझिम आली ही गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित होत असे दिवसभरात पुरंदर तालुक्यात शंभरीच्या वर गणेश मंडळांची श्रींची स्थापना केली जाते.
शाडूंच्या मूर्तींची मागणी घटली
विविध आकारातील आणि विविध प्रकारांतील तसेच शाडू माती, पेणच्या मूर्ती, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आदी 251पासून सुमारे 5 हजार रुपये किमतीपर्यंत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यावर्षी शाडूच्या मूर्तींची मागणी कमी प्रमाणावर आहे. घरगुती गणेशमूर्तींची मागणी ही मोठ्या प्रमाणावर आहे. असे प्रताप कुंभार गणेश मूर्ती व्यवसायिक यांनी सांगितले.





