पुणे जिल्हा : भोर तालुक्याचा बारावीचा टक्का यंदा थोडा घसरला

– १४० विद्यार्थी गुणवत्ता यादीत,५३६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
भोर – राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा भोर तालुक्याचा निकाल ९४.४३ टक्के लागला आहे. मागील वर्षी ९४.५५ टक्के निकाल लागला होता. तर, यावर्षी ९४.४३ टक्के लागला असला तरीही विद्यार्थ्यांची संख्या घसरली आहे.
गेल्या वर्षी बारावीला २ हजार १ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यावर्षी १ हजार ९७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तालुक्यातून १४० विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तालुक्यातील ७ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागलेला आहे. यामध्ये शिवाजी विद्यालय व ज्यु कॉलेज नसरापूर, जिजामाता ज्युनिअर कॉलेज भोर, अमृता विद्यालय नसरापूर, काशिनाथराव खुटवड कनिष्ठ महाविद्याल हातवे, क्रांतीवीर वासुदेव फडके स्मृती विद्यालय चिखलगाव, युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, नवसह्याद्री गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल नायगाव आदींचा समावेश आहे.
याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचा निकालही १०० टक्के लागलेला आहे. यामध्ये राजा रघुनाथराव कनिष्ठ महाविद्यालय व्यवसायीक अभ्यासक्रम, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व्यावसायिक अभ्यासक्रम, श्री शिवाजी सेकंडरी अॅड हायर सेकंडरी स्कूल, अनंतराव थोपटे महाविद्यालय, गर्ल्स ज्यु कॉलेज आदींचा समावेश आहे. तर १६२ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मंगळवारी दुपारी बारावीचा निकाल जाहीर झाला. परंतु विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षीइतका उत्साह जाणवला नाही. विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्कंठाही पहावयास मिळाली नाही. शहरातील सायबर कॅफे आणि एमएससीआयटीच्या अधिकृत प्रशिक्षण केंद्रांवरही निकाल पहाण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम होती.
तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे – राजा रघुनाथराव विद्यालय व ज्यु कॉलेज भोर (९५.९७), छत्रपती शिवाजी ज्यु. कॉलेज भोर (९१.४८), अनंतराव थोपटे कनिष्ठ महाविद्याल भोर (८४.८७), गर्ल्स ज्यु कॉलेज भोर (८२.३५), महात्मा ज्योतीबा फुले प्रशाला व ज्यु कॉलेज शिंदेवाडी (८३.८७), न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु कॉलेज संगमनेर (७८.७८), माध्यमिक विद्यालय व ज्यु, कॉलेज खानापूर (८३.३३), दिनकरराव धाडवे पाटील ज्यु कॉलेज सारोळे (९८.३६), राजगड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स (९८.६८).





