पुणे जिल्हा : जुन्नरमध्ये ठाकरे गटाचे मूक आंदोलन

जुन्नर : बदलापूरसह राज्यात अनेक ठिकाणी शाळकरी मुली व महिलांवर होत असलेल्या अत्याच्याराच्या घटनांचा निषेध जुन्नरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन करण्यात आले.
शहरातील पाच रस्ता चौकातील छत्रपतींच्या स्मारकालगत शनिवारी (दि. 24) भर पावसामध्ये निषेध मूक आंदोलन करण्यात आले. माजी आमदार बाळासाहेब दांगट, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, गुलाब पारखे, सुनील मेहेर, बाबा परदेशी, चंद्रकांत डोके, समीर भगत, बन्सी चतुर, उत्तम काशीद, विनायक गोसावी, शैलेश बनकर, सौरभ वरपे,
अथर्व जुंदरे, सुनील खंडागळे, अरुण लांडे आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बदलापूरसह राज्यात अनेक ठिकाणी महिला मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या होत असलेल्या घटनांच्या विरोधात आणि राज्यातील महायुती शासनाच्या विरोधात उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी तोंडाला काली पट्टी बांधून मूक आंदोलन करीत या घटनांचा निषेध व्यक्त केला.





