राजगुरूनगर: राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एका सजात काम करत असताना तलाठी संतोष पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करून खून केल्याप्रकरणी राज्यभरासह खेड तालुक्यातील तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्यावतीने निषेध करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील तलाठ्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर कामबंद आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन देऊन भ्याड हल्ल्याचा निषेधल करण्यात आला. शासकीय कर्मचार्यांवर हल्ला, दमबाजी करणार्या दोषींना आजामीनपात्र कायदा लागु करावा, मयत तलाठी संतोष पवार यांच्या कुंटुबाला 50 लाखांच्या मदतीसह अनुकंपातत्वावर नोकरीत घ्यावे, आरोपीवर खटला फास्ट ट्रॅककोर्टात चालवण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. खेड तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष दीपक कट्टे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकार्यांसह तलाठी, मंडलाधिकारी या निषेध आंदोलनात काळ्या फिती लावत दिवसभर कामबंद केले.