पुणे जिल्हा : रांजणगातील सर्व कंपन्यांचा कर पूर्वीप्रमाणे

पांचुदकर यांची माहिती : शंभर टक्के कर ग्रामपंचायतींना
रांजणगाव गणपती – रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवी या ग्रामपंचायतींना मिळावा, या मागणीसाठी मुंबई येथे चर्चा झाली असून, आगामी काळात यासंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आंबेगाव-शिरूर विधानसभा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी दिली.
रांजणगाव गणपती, ढोकसांगवी, कारेगाव परिसरातील विविध विकासकामांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत मंत्रालयात आढावा घेण्यात आला. बैठकीस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), उद्योगमंत्री उदय सामंत, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे) आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिंग पाचुंदकर पाटील, आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जगताप, आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अजित कोहकडे, रांजणगाव गणपतीचे उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर पाटील, रांजणगाव गणपतीचे ग्रामपंचायत सदस्य अनिल ढुंडे, नेताजी फंड, अशोक शेळके, नीलेश लांडे, हर्षल गदादे, दीपक खैरे, संदीप गवारे यांच्यासह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री अजित पवार व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना प्रश्न सांगितल्यावर उद्योगमंत्री सामंत यांच्याबरोबर बैठक आयोजित केली. हा निर्णय राज्याचा असल्याने आगामी काळात हा निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळासमोर हा विषय मांडू व सकारात्मक निर्णय घेऊ, असे सामंत यांनी सांगितल्याचे पाचुंदकर यांनी सांगितले.
मविआचा निर्णय बदलला
पाचुंदकर यांनी सांगितले की, तीनही गावांमध्ये रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कामगारांमुळे अतिरिक्त भार पडला आहे. सर्व सुविधा कंपनीच्या येणाऱ्या करातून होत होत्या. मात्र, २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा कर पन्नास टक्के ग्रामपंचायतीला व पन्नास टक्के एमआयडीसीला, असा निर्णय तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतल्याने ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर मर्यादा येऊ लागल्या होत्या. यासंदर्भात पाठपुरावा केला आहे.





